मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे ३४) टोळ

जागु · · पाककृती
टोळ हा मासा समुद्रात मिळणारा हा दिसायला लांबलचक व सुंदर चकचकीत असतो. ह्याच्या शेपटीला टिकलीसारखा काळा ठिपका असतो. Image removed. ह्याचे डोके म्हणायची की चोच असाच प्रश्न पडतो मला ती लांब लचक असते. Image removed. हे मासे समुद्रात उडतात. आतुन काही भाग जरा पोकळसर असतो. पण चविला चांगले असतात. साहित्यः टोळ मासे १ वाटा Image removed. रस्श्यासाठी: वाटण - पाव वाटी ओल खोबर, अर्धा इंच आल, ५-६ लसुण पाकळ्या, १ मिरची, थोडी कोथिंबीर हिंग हळद मसाला मिठ तेल चिंचेचा कोळ तळण्यासाठी चिमुटभर हिंग हळद मसाला मिठ तेल लिंबू (ऑप्शनल) पाककृती: रस्सा: टोळीचे डोके व शेपुट काढून टाकायचे. मधल्या भागाचे आपल्याला सोयिस्कर आकारात तुकडे करायचे. हे तुकडे तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायचे. Image removed. भांड्यात तेल गरम करुन त्यावर ४-५ लसुण पाकळ्यांची फोडणी द्यायची. मग त्यावर लगेच हिंग, हळद, मसाला घाऊन लगेच वाटण टाकायचे. त्यातच चिंचेचा कोळ, मिठ घालायचे व मग टोळच्या तुकड्या टाकायच्या. रस्सा ५-१० मिनिटे उकळवून ग्यास बंद करायचा. तळलेले टोळः धुतलेल्या तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला हवा असल्यास लिंबू रस लावावा. तवा चांगला तापल्यावर तुकड्या शॅलोफ्राय कराव्यात. तुकड्या ३-४ मिनीटांनी पलटा व परत दुसरी बाजू शिजवुन गॅस बंद करा. (रेडी रेसिपिज चा फोटो काढायला विसरले त्याबद्दल क्षमस्व. मी परत केल्यावर टाकतेच)

वाचन 12545 प्रतिक्रिया 0