मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नरेंद्र मोदी यांचे उपोषण

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले. काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती. १९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप. बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली. ४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले. ते दिल्लीमधे उपोषणाला बसले. एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला. आंदोलन प्रचंड यशस्वी. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर यांनीही महत्वाची भूमिका बजावली. उपोषणालाही एक ग्लॅमर मिळाले. या सगळ्यामधे झालं काय ? लोक कालच्या हीरोला विसरले. सचिन मागे पडला. इंग्लंड दौर्‍यानंतर तर अधिकच. बरं कुणी ऐरागैरा नाही उपोषण करत. सोनिया राहूल नाही करीत उपोषण, जमले तर इफ्तार पार्टीमधे काही बाही खातानाच दिसतात. पवार - त्यांच्याबद्दल तर कल्पनाही नाही करवत. त्यांना आपली फिगर मेंटेन करायचीय, करतील कशाला ते उपोषण. पण नरेंद्र मोदींनी उपोषण केले तेव्हा मात्र आम्हाला प्रश्न पडला त्यांनी असं का करावं, हीच वेळ का निवडावी, उपोषणाचच हत्यार त्यांनी का उपसावं. त्यांच्याबद्दल अलिकडे काही बातम्या छापून येत आहेत, ज्या त्यांच्यासाठी सुखद आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, मोदी कुठलीही गोष्ट उगाचच करणार नाहीत सकारण करतील.नियोजन करून करतील. मागे विजय तेंडूलकर गेले तेव्हा विजय तेंडूलकर यांना त्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली होती. चार चांगले शब्द त्यांच्याबद्दल काढले होते. अनेकांच्या भुवया उंचावल्या. जाणकार म्हणाले 'ये भी उनकी एक सोची समझी चाल हैं' असो त्यांनी आत्ताच हे उपोषण का करावं --

वाचन 4987 प्रतिक्रिया 0