"परतीच्या वाटेवर....."
लेखनप्रकार
"परतीच्या वाटेवर....."
वारयाच्या वेगाने चाललेल्या राजसच्या कारसमोर क्षणार्धात ,अकस्मात एक आकृती गाडीलाआडवी झाली ,आणि काही कळायच्या आत राजसने सगळा जोर लावून कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला .
भीतीने गच्च बंद झालेले डोळे उघडून "एव्हड्या काळोख्या रात्री ते ही घाटामध्ये गाडीखाली कोण आल ? आणि गाडीचा अप्पर डीपर चालू असताना मला कस कोणी दिसलं नाही ,कोण असेल ?एखादा प्राणी ?कि कोणी मनुष्य ? पण कुणाचा किंकाळण्याचा आवाज तर नाही आला ,पण टायर स्पीड ब्रेकरवर गेल्यावर जसा फील येतो तसा काहीस जाणवलं ,नक्कीच काहितरी झालय म्हणून घामाने डबडबलेला राजस गाडीतून बाहेर आला .
नीट न्याहाळून बघितले काहीही नव्हत ,खाली वाकून ,मागे पुढे होवून पाहिले तरी कुणीही नव्हत ? मला भास तर नाही झाला ना?
गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता दुरदुरपर्यंत मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा मागमूस नव्हता या विचारानेच राजस घाबरा झाला ,आणि पुन्हा गाडी स्टार्ट करणार तोच.....
एक कर्ण- कर्कश किंचाळीने गाडीत पेंगलेली तेजू खडबडून जागी झाली , बावरलेली , गोंधळलेली...
, भितीन तीच काळीज धडधडत होत .राजस कुठे आहे?गाडी का थांबवली आहे नक्की काय गडबड आहे ?
आता ऐकलेली किंकाळी कुणाची होती ?राजसला काही झाले तर नाही ना?
तेजूने राजसला दोन तीन आवाज दिले काहीच रिप्लाय नाही, ती एकदम घाबरी झाली अंगावर काटा
आला ,घाईत थरारत्या हाताने तिने राजसचा मोबाईल डायल केला
पण रिंग गाडीतच वाजत होती मोबाईल गाडीतच होता
" देवा काय होतंय हे ?राजस राजस ओरडून तेजूचा घसा कोरडा पडला होता
भीतीने अर्धमेली झालेल्या तेजुला पुन्हा एकदा ती आर्त किंकाळी एकू आली
आणि ती आवाजाच्या दिशेने पळू लागली
पण तिला अचानक जाणवलं कि कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे
मागे बघायची तिची हिम्मत होत नव्हती ,पण कुणीतरी नक्कीच होत म्हणून ती जीव मुठीत धरून वाट दिसेल तशी सैरावैरा पळू लागली ,एकीकडे राजसला आवाज देत होती ,एकीकडे ती अज्ञात शक्ती /व्यक्ती तिचा पाठलाग करीत होती
कुणीतरी मागून तिच्या खूप जवळ आलेलं आणी त्या व्यक्तीचा रक्ताळलेला हात फक्त तिला दिसला
आता ती झुडूपामधून काट्या-कुट्यातून पळत होती ती व्यक्ती तिच्या खूप जवळ येत होती, दमलेल्या तेजुचे त्राण सर्व प्राण तिच्या पायात जमा झाले होते
तिची हृदयाची धडधड तिला स्पष्ट एकू येत होती घामेजलेली तेजू , भीतीने अवसान गळालेली तेजू नुसती जीवाच्या आकांताने ओरडण्याचा खूप प्रयत्न करीत होती पण हे काय ?
सर्व शक्तीनिशी ओरडून हि तिच्या कंठातून आवाज बाहेर येत नव्हता रिमोटने टि. व्हि .चा आवाज म्युट होतो तसा काहीसा !
भांबावलेली तेजू कुठल्यातरी डोंगर दरीत असलेल्या दगडी पायर्या उतरून खाली पळत होती जीव वाचवत होती आणि अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला ,खोल गर्तेत कोसळली !
अन दचकून भीतीने गच्च मिटलेले डोळे उघडले
समोर राजस होता तिच्याकडे सांशक नजरेने पाहत होता , तिला न्याहाळीत होता
तेजुने त्याला लगेच मिठी मारली घाबरलेल्या तेजुला क्षणभर हायसे वाटले
सभोवताली पहिले तर तो त्यांचाच बेडरूम होता
म्हणजे म्हणजे ?
तिने स्वताशीच म्हटले " ओह माय गॉड ! हे स्वप्न होत? किती भयंकर ,माझा विश्वास बसत नाहीये
भीतीने घामाघूम झालेल्या तेजूने राजसकड पाहिलं,
हो ते कळल मला तू झोपेत ,किंचाळत होईस , झोपेतही किती एक्सप्रेशन्स होते तुझ्या चेहर्यावर !
भूत बित पाहिलास न स्वप्नात ? बरोबर ना?
नाही म्हणजे आपण मघाशी हॉरर सिनेमा पहिला तो डोक्यातच घोळवत बसली असशील ना ?
काय पण तुम्ही मुली किती भित्र्या असता नाही ? अग पहिला ना कि तिथेच सोडून द्यायचं असत इतका विचार नाही करायचं बघ किती घाबरली आहेस तू !
तू पाहिलं आहेस का कधी भूत बित ? तुला कधी भेटलय का ?
मग अशा फालतू गोष्टीवर ईतका विचार?
तुला ना एक रात्र अंधारया खोलीतच कोंडून ठेवतो, त्याशिवाय काही भीती जाणार नाहीये तुझी !
नाही, नको नको ,राजस प्लीज अस नको करू प्लीज प्लीज मला भीती वाटते म्हणून तेजू रडू लागली
राजस : " अग अग ,मी गम्मत केली तुझी मी खरच अस वागेन का तुझ्याशी?"
लग्न झाल्यापासून बघतोय किचन मध्ये वाटी जरी पडली तरी कसली दचकतेस? सतत कुणीना कुणी बरोबर हव असता तुला ?
रात्रीच किचन मध्ये एकटीने जाऊन पाणी पिण्याची हिम्मत नाही होत तुझी म्हणूण पाण्याची बॉटल उशाशी घेऊन झोपतेस , म्हणजे आय मीन इतकी का घाबरतेस तू ?
का का ? सान्ग कि मला, कशाची भीती दड्लीय एव्हढी तुझ्या मनामध्ये ?सान्ग ना?
तेजू रडता रडता अचानक शांत झाली अन डोळे रोखून ,स्तब्ध राजसकडे एकटक पाहू लागली .
क्रमश :
.
वाचन
9567
प्रतिक्रिया
0