मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोबाईल

विकास · · काथ्याकूट
मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो. अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते. आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली. ज्यातील माहीती कायमच कुठेन कुठे तरी ऐकली आहे पण इतकी अधिकृत कशी आणि कोणी दिली असे वाटले:
मोबाइलचा वापर सर्वांनाच धोकादायक 16 Jun 2008, 1751 hrs IST नवी दिल्ली , मटा ऑनलाइन वृत्त मोबाइल फोनमुळे होणा-या रेडिएशनचे शरिरावर अनेक वाईट परिणाम होतात. म्हणूनच लहान मुले आणि गर्भवती महिला मोबाइल फोनचा वापर करत असतानाच्या प्रचार मोबाइल फोनचे सर्विस प्रोवायडर आणि फोन निर्मात्यांनी टाळावा अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. मोबाइल फोनमधून निघणा-या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्ज या मोबाइलचा वापर करणा-यांच्या डोक्यातील टिश्यूला नुकसान पोहोचवू शकत असल्याचे दूरसंचार मंत्रालयाने अलिकडेच जाहीर केलेल्या मार्गदर्शनपर सूचनेत म्हटले आहे. तसेच लहान मुले , गर्भवती महिलला , हृदयविकाराचे रूग्ण यांनी मोबाइल फोनचा वापर कमी प्रमाणात करावा , असेही या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ....
वरील बातमी मुळे काही प्रश्न उद्भवतातः (हे विचारत असताना मोबाईलच्या दूष्परीणामांबद्दल मला शंका घेण्याचा उद्देश नाही. किंबहूना अशा सुचनेचे स्वागतच आहे)
  1. सामाजीक स्वास्थ्याच्या दृष्टीने इतकी महत्वाची बातमी असून देखील इतकी शांतपणे कशी दिली जात आहे?
  2. त्यासाठी सरकारने नक्की कुठले वैज्ञानिक निरीक्षण संदर्भ म्हणून वापरले?
  3. इतरत्र (देशांमधे) इतके अधिकृतपणे (सरकारी) सांगितले गेले आहे का?
  4. वास्तवीक राजकारण्यांचा विचार करता मोबाईल कंपन्या त्यांना सहज खिशात घालून गप्प करू शकतील असे वाटते. तरी देखील असली सुचना जर दिली जात असेल तर याचा अर्थ सरकार कडे काही समाजस्वास्थ्यासंदर्भात अधिक माहीती उपलब्ध झाली आहे का? की ज्याबद्दल विशेष न बोलता फक्त अशी सुचना दिली जात आहे?
  5. आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला या संदर्भात (मोबाईल वापर) काय वाटते?

वाचन 16456 प्रतिक्रिया 0