मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ए.एम.सी.

विनायक प्रभू · · काथ्याकूट
"ए.एम.सी. म्हणजे काय हो"? अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. "दुसरा काही अर्थ"? कुठे ऐकलास हा शब्द? "सहाव्या माळ्यावर गेले होते. तीने कालीकत इडलीचा घाणा टाकला होता. पिठाची आमटी झाली होती. त्या साठी मदत करायला गेले होते. तीच्या मैत्रीणिच्या तोंडातुन शब्द कळला. बहुतेक आपल्या नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती" अस्स का? विचार करायला लागेल. मग पिठ घट्ट झाले का? "केले कसे तरी. साधी इडली करायला येत नाही चालली कालीकत इडली करायला". म्हणजे ११वी १२वी चा बेसिक अभ्यास न करता सी.ई.टी. परिक्षेत १८० मार्क मिळ्ण्याची अपेक्षा. " जे काही थोडा वेळ होते त्यात एक कळाले अनेक बेसिक मधे खुपच प्रॉब्लेम्स आहेत. हॅहॅहॅ. "ते राहु दे. ए.एम.सी म्हणजे काय? नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती म्हणजे...... हां आल लक्षात. ए मेल चुवानिस्ट किंवा शुवानिस्ट. "हा काय प्रकार असतो? चुवानिस्ट काय करतो? त्याची लक्षणे काय"? फार मोठा विषय आहे.म्हटले तर बिरुदावली. म्हटले तर शिवी. म्हटले तर जेनेटीक डीझाईन. "थोडा फार सांगा. हा चुवानिस्ट कसा काय ओळखावा"? हे काय तुझ्यासमोर बसलाय. "काय सांगताय? तुम्ही"? मघाशी ह्हॅहॅ केले ते एक लक्षण. "हो क्का? आणखी काही सांगा बघु. आपण आपल्या बद्दल बोलु या. बघ आपल्याकडे गोकुळाष्टमी झाली. एवढे पाहुणे आले. जवळजवळ सगळे काही तुच केलेस.पाहुणे गेल्यावर घराची साफसफाई करण्यामधे सुद्धा माझा सहभाग काहीही नव्हता. भांडी साफ करायला मदत करु का? कचरा काढु का? असे विचारल्यावर तु नाही म्हटलस. "शी. ते काही तुमच काम होते का"? अस तुला वाटते? पण मी हे करत नाही म्हणुन घरातल्या तरूण स्त्री वर्गाच्या नजरेत मी मेल चुवानिस्ट पिग. "डुक्कर"? हो तर. तु सर्व आटोपत असताना मी डुकरा सारख लोळत होतो की. तुझ्या बहीणीचा नवरा मशिन लावुन कपडे धुतो. मला ते तु करु देत नाहीस. म्हणजे तुझ्या बहीणीच्या नजरेत मी एम सी पी. सर्व नजरेचा कारभार. "पण अशी काही कामे तुला सांगायची नाहीत असे मला लग्नाच्या आधीच मोठ्या जावेने सांगितले होते". त्याला पण एक कारण आहे. मी घरातला राजकुमार होतो. स्पेशल वन. आणि ते तुला सांगितले नसते तर तु मला करायला दिले नसते हा तुझ्या संस्काराचा भाग. आणखी एक कारण असे की तुला डीश वॉशर वर विश्वास नाही. तर माझ्यावर कसा असणार? " असु दे हां. मला तु आहेस तसाच बरा आहे. बहीणीला तु आणखी काय काय करु शकतोस हे सांगितले तर ती बेशुद्ध पडेल." खीखीखी. "आणखी काही"? हे अगदी वर वर झाले. ह्या एम्सीपी ची व्याप्ती फार मोठी आहे. कारणे पण असतात. आणि कारण दाखवुन जस्टीफिकेशन पण असते. "म्हणजे"? मी एम्सीपी आहे हे जाहीर पणे कबुल करणे सुद्धा एम्सीपी चे लक्षण आहे. सर्वात मोठे कारण असे की स्त्री जिच्यावर जन्मापासुन अवलंबुन असतो तीचे काही क्षणापुरता सुद्धा वर्चस्व सहन न झाल्यामुळे जे वैफल्य पुरुषामधे येते त्यातुन ह्या डुकराचा जन्म होतो. "अय्या, म्हणजे फक्त बायको नाही" सर्व जण येतात त्यात. आई, बहीण्,मैत्रीण कोणिही सुटत नाही. स्त्री चा वागण्यात बोलण्यात सतत अनादर हा डुक्कर करत असतो. "पण तु तसा करत नाहीस" पातळी वेगवेगळी. ती कमी असेल तर फारसा काही ही प्रॉब्लेम नसतो. आजही मी तुला कधी कधी मंगळसुत्र न घालता, कुंकु न लावलेल्या अवस्थेत बघतो तेंव्हा थोडा अस्वस्थ होतोच की. "अय्या, हे मला माहीतच नव्हते.. "वरच्या पातळीची उदाहरणे" नको. "सांगा हो". नेटवर उप्स मोमेंट नावाचा प्रकार असतो. बादली भर लाळ गाळुन बघतो. पण त्याच्या शतांश प्रकार आपल्या घरात झाला की तुफानी हल्ला बोल होते. कांदीवलीच्या सिग्नल वर एका डुकराने बाईक वर बसलेल्या लो कट जिन्स मुलीच्या पँटीत मागुन जळती सिगारेट टाकली. पोलीसानी पकडल्यावर वरुन "अपनी शरम संभालनेको नाही आता क्या" असा प्रश्न. अर्थात ही विकृती कडे जाणारी पायरी. व्याख्या अनंत आहे. चौकटी प्रमाणे बदलणारी, जस्टीफिकेशन नुसार वाकणारी..... पण असे का? आता नको पुन्हा कधी. जाता जाता: माझ्या लो लेवल चा तुला त्रास झाला तर एक उत्तम उपाय सांगतो. त्या दिवशी तु मला अहो अशी हाक न मारता 'अ‍ॅहो' किंवा 'आहो अशी हाक मारायची. म्हणजे मला लगेच मेसेज मिळेल. "हीहीही"

वाचन 11650 प्रतिक्रिया 0