मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॅकींग उत्तरप्रदेशच्या गन्ना शोध परिषदेची !!

यकु · · काथ्याकूट
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, काश्मिरमधील लोकांना पाठिंबा देण्याचा दावा करणार्‍या / काश्मिरच्या स्वांतत्र्याची मागणी करणार्‍या तथाकथित एक्स्ट्रिमिस्ट हॅकर्सनी एक भारतीय संकेतस्थळ हॅक केले आहे. कुठले? तर उत्तर प्रदेश गन्ना शोध परिषदेचे! आत्ता सहज संदर्भ शोधण्यासाठी या संकेतस्थळावर गेलो तर ही साईट हॅक झालेली दिसली (कदाचित अजून ही बातमी झालेली नसावी). ही साईट विकिपिडीयावर उत्तर प्रदेश शासनाचे संकेतस्थळ म्ह्णून नोंद आहे. भारत सरकारची इतर संकेतस्थळेही तपासून पाहिली, ती व्यवस्थित चालू आहेत. वरील संकेतस्थळ तसे सुरक्षा उपायांच्या बाबतीत दुर्लक्षित असे मानण्यास भरपूर वाव आहे - कारण हॅक करुन काय केले तर गन्ना शोध परिषद ! हॅक झालेले संकेतस्थळ : http://www.upcsr.org
यथावकाश उत्तर प्रदेश शासन योग्य ती पावले उचलून ही साईट हॅकर्सच्या ताब्यातून मुक्त करील अशी आशा आहे. पण हॅकींग सारख्या बाबतीत येथील रथी-महारथींची चर्चा ऐकण्यास उत्सुक आहे.

वाचन 3278 प्रतिक्रिया 0