मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुडदुश्याची आमटी,तळलेल्या वेर्ल्या,पेडवे,मुडदुश्या व सोलकढी.

ज्योति प्रकाश · · पाककृती
Image removed. १)मुडदुश्याची आमटी. साहित्यः-५-६ मुडदुश्या.(याला सुळे असेही म्हणतात) २-३ वाट्या खवलेलं ओले खोबरे. अर्धा लहान कांद उभा चिरून व उरलेला अर्धा बारीक चिरून. एक चमचा धणे, ७-८ मिरी. अर्धा चमचा हळद अडीज चमचे लाल तिखट्(हिम्मत असल्यास तब्येतीनुसार) चिंच. फोडणीसाठी खोबरेल तेल अर्धा चमचा तांदळाची पिठी. कृती :-ह्या सुटी केलेल्या मुडदुश्या(सुळे) Image removed. कृती :-सर्व साहित्य(मुडदुश्या सोडून) चांगले बारीक वाटून घेणे.फोडणीसाठी खोबरेल तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा मंद गॅसवर लालसर होईपर्यंत परतावा.त्यात मग मुडदुश्या घालाव्या.व लगेच बारीक वाटलेले वाटण घालावे.तत्पूर्वी वाटणाला तांदळाची पिठी लावावी.मिठ घालावे.चांगली उकळली व मासे शिजले कि गॅस बंद करावा. Image removed. २)तळलेले वेर्ल्या,पेडवे व मुडदुशी. ह्या वेर्ल्या Image removed. हे पेडवे. Image removed. साहित्यः-तांदळाची जाडसर पिठी.,हळद्,लाल तिखट,मिठ,तेल. कृती :-माश्यांना हळद्,निखट व एक चिमूट मिठ लावावे.तांदळाच्या पिठीत घोळवून तेलात चुरचुरीत तळावे. Image removed. सोलकढी. साहित्यः-२-३ चमचे ओल्या नारळाचा चव. २ पाकळ्या लसूण अगदी थोडी हिरवी मिरची. मिठ व २-३ आमसूले. कृती :-प्रथम एक पेल्यात आमसूले साधारण अर्धा तास आधी भिजत घालावी.त्यातच चवीप्रमाणे मिठ घालावे. नारळाच्या चवात लसूण्,हिरवी मिरची व पाणी घालून वाटून घ्यावे.वाटपाचे पाणी आमसुले घातलेल्या पेल्यात पिळून घ्यावे.वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.लसूण व हिरवी मिरची वाटपात न घालता चेचून घातली तरी चालते. मग काय कसा काय वाटला बेत?

वाचन 9601 प्रतिक्रिया 0