मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटाटा वडा

Mrunalini · · पाककृती
साहित्यः बटाटे - ३ उकडलेले बेसन पीठ - १ वाटी कांदा - १ बडिशेप - १/२ चमचा आले-लसुण पेस्ट - १ चमचा हिरव्या मिरच्या - २ ओवा - १/४ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १ चमचा कडिपत्ता - ४-५ तेल तळण्यासाठी मिठ चवीनुसार २ हिरव्या मिरच्या आणि लसुणची चटणी सजावटीसाठी कृती: १. कांदा बारीक चिरुन घ्यावा. उकडलेले बटाटे हाताने कुस्करुन घ्यावेत. २. हिरव्या मिरच्या व बडिशेप मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे. ३. कढईत २ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कडिपत्ता टाकावा. ४. कडिपत्ता थोडा तळला गेल्यावर त्यावर कांदा २-३ मिनिट परतुन घ्यावा. ५. त्यामधे हळद, आले-लसुण पेस्ट व हिरवी मिरची-बडिशेप टाकुन परतावे. ६. २ मिनिट हे परतल्यावर त्यात बटाटा टाकावा. ७. त्यात चवीनुसार मिठ व थोडी कोथींबीर बारीक चिरुन टाकवी. निट मिक्स करुन २-३ मिनिट झाकुन ठेवावे. थोड्या वेळाने गॅस बंद करावा. ८. दुसर्‍या भांड्यामधे १ वाटी बेसन, ओवा, लाल तिखट, हळद व चवीनुसार मिठ टाकावे. आपण भजी करताना batter बनवतो, त्याप्रमाणे ह्याचे batter बनवुन घ्यावे. batter तळल्यानंतर crispy होण्यासाठी ह्यात १ चमचा गरम तेल किंवा १ चिमटी खायचा सोडा टाकावा. ९. हे करत असताना दुसर्‍या कढईत तळण्यासाठी तेल गरम करण्यास ठेवावे. १०. बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करुन घ्यावेत व त्याला वड्यांचा आकार द्यावा. प्रत्येक वडा बेसनाच्या batter मधे बुडवुन त़ळुन घ्यावा. ११. हे वडे तळलेली मिरची किंवा लसुणची चटणी ह्यासोबत गरम serve करावा. Image removed. Image removed. Image removed.

वाचन 28771 प्रतिक्रिया 0