मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कॉकटेल लाउंज १ : Mojito (mo-HEE-to, मोहितो)

सोत्रि · · पाककृती
मागे माझ्या एका धाग्यावर (कॉकटेलच्या) आलेल्या प्रतिक्रियेमधून नाटक्या ह्यांची साकिया ही मालिका अलीबाबाच्या गुहेसारखी सापडली. अधाश्यासारखी वाचून काढल्यावर नाटक्या ह्यांचा फॅन होउन मी त्यांचे स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले. एकलव्याप्रमाणे नाटक्या ह्यांना गुरुस्थानी मानून वेगवेगळी कॉकटेल्स बनविण्याची साधना सुरु केली. जवळ जवळ एक वर्षाच्या तपस्येनंतर आपणही काही कॉकटेल सादर करावी अशी इच्छा झाली. त्यानुसार ‘कॉकटेल लाउंज’ ही माझ्या आवडीच्या कॉकटेल्सची मालिका सुरू करीत आहे. ह्यात काही खास ‘देसी धमाका’ कॉकटेल्ससुद्धा असणार आहेत. नाटक्या ह्यांच्याइतकी प्रतिभा नसल्यामुळे ‘साकिया’ ह्या त्यांच्या मालिकेत ढवळाढ्वळ न करता स्वतंत्र मालिकेचा प्रपंच. गुरूदेव (नाटक्या) चूकभुल देणे घेणे आणि आशिर्वाद असू द्यात. तर ‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील पहिले कॉकटेल आहे Mojito (mo-HEE-to, मोहितो). Mojito 1 मोहितो कुठे आणि कोणि शोधले हा वादाचा मुद्दा आहे. हे एक क्युबन क़ॉकटेल आहे हे मत मी स्विकारून माझ्यापुरता वाद संपवला आहे :) उन्हाळ्यात, रणरणत्या उन्हाच्या काहिलीवर हा रामबाण उपाय (उतारा म्हणू का ? ;)) साहित्य: व्हाइट रम - 2 औस लिंबाचे लहान तुकडे(फोडी) - 4-5 ब्राउन शुगर - एक चमचा (दुसरा पर्याय: पीठी साखर) पुदीन्याची ताजी पाने - 8 लिंबाचा रस - 0.5 औस शुगर सिरप - 0.5 औस सोडा बर्फ - बारीक तुकडे केलेले (क्रश्ड आइस) ग्लास - कोलीन्स असल्यात उत्तम कृती: ग्लासमधे लिंबाचे तुकडे(फोडी), ब्राउन शुगर आणि पुदीना (5 पाने) टाकून ते चेचावे. (चेचण्याच्या प्रक्रियेला मड्ल (Muddle) म्हणतात. चेचल्यामुले पुदीन्याचे फ्लेवर सुटुन एक आगळीच फ्रेश चव येते) आता रम, शुगर सिरप, लिंबाचा रस त्यावर ओता. बर्फाने ग्लास भरून घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर (ह्या, ‘ढवळा’ हे कसेसेच वाटतेय म्हणून स्टरच :) ) करा. ग्लासच्या उरलेल्या जागेत सोडा टाकून ग्लास टॉप अप करा. उरलेली 3 पुदीन्याची पाने सजावटीकरीता ग्लासच्या कडेला लावा. मोहितो तयार. मोहितो 2 क्रमश: (पुढचे कॉकटेल : व्हाइट रशिअन)

वाचन 18824 प्रतिक्रिया 0