डल्लासविषयी माहिती हवी आहे
नमस्कार मंडळी,
मागची २ वर्षे आम्ही पोटापाण्याच्या गडबडीत असल्याने मिपावर येउ शकलो नाही. (ऑफशोअरला लई काम असते बुवा).
तर सांगायचा मुद्दा असा की नोकरीनिमित्त आम्हाला डल्लास (टेक्सास) येथे १-२ वर्षाकरता जावे लागणार आहे. मी किंवा माझे कोणी मित्र, परिचित अमेरिकेत गेलेले नसल्याने मल मिपाकरांकडुन थोडी मदत हवी आहे. मी माझे प्रश्न शंका खाली विचारल्या आहेत, जमेल तितके शंका समाधान करावे अशी विनंती.
१. डल्लास शहर राहण्यासाठी कसे आहे.(गुन्हेगारी, वर्णद्वेष आहेत का)
२. डल्लासमध्ये राहण्यासाठी सुयोग्य परिसर कोणता? (कामाचे ठिकाण बहुतेक चेस सेंटर असणार आहे).
३. सार्वजनिक वाहतुक सुविधा कितपत आहेत? डार्ट चांगली आहे का? की स्वत:ची गाडी भाड्याने/ विकत घ्यायला पर्याय नाही.
४. गाडी वापरायची असल्यास विकत घेतलेली बरी की भाड्याने बरी?
५. भारतातला आंतरराष्ट्रीय वाहतुक परवाना चालतो का? किती दिवसापर्यंत चालु शकतो?
६. घरभाडे साधारण किती असते?
७. ईंटरनेट कनेक्शन तात्काळ मिळते का?
उत्तरांच्या प्रति़क्षेत,
आपला,
गणा मास्तर (भोकरवाडी बुद्रुक)
वाचन
12623
प्रतिक्रिया
0