मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्टफ्ड बन्स

सानिकास्वप्निल · · पाककृती
ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :) अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे. Image removed. साहित्य बन्ससाठी: ११/२ कप मैदा १/४ कप पाणी १/४ कप दुध ३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट १ टेस्पून साखर ३/४ टीस्पून मीठ ३ टेस्पून ऑल्हिव ऑईल Image removed. बन मधे भरण्यासाठी तुमच्या आवडीची कुठली ही सुकी भाजी, उदा; उकड्लेल्या बटाटयाची, बटाटा-मटार सुकी भाजी .इ. पाकृ: दुध कोमट गरम करावे व त्यात साखर आणी ड्राईड यीस्ट नीट मिक्स करुन बाजुला ठेवावे. दुसर्‍या भांड्यात मैदा घ्यावा व मधे खळगा करुन त्यात मीठ, पाणी, तेल व यीस्ट्+दुधाचे मिश्रण घालावे. Image removed. सगळं नीट एकत्र करुन सैलसर पीठ मळून घ्यावे.सुरुवातीला थोडे चिकट पीठ वाटेल पण नीट मळले की छान मऊसुत पीठ तयार होईल. तेल लावलेल्या भांड्यात पीठाचा गोळा ठेवून , वरून क्लिंग फॉईल लावून उबदार ठिकाणी १ तासभर ठेवावे . Image removed. एका तासानंतर पीठ फुगून दुप्पट झालेले असेल. Image removed. फुगलेले पीठ चांगले मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून परत १० मिनिटे उबदार ठिकाणी ठेवणे. Image removed. पुन्हा गोळे फुगतील. Image removed. फुगलेल्या गोळ्यांना चांगले मळून त्याचे वाटी /पारी तयार करुन त्यात तुमच्या आवडीचे सारण भरून नीट बंद करणे. Image removed. वरून तयार बन्संना मिल्क वॉश / एग वॉश देणे (दुध / अंड कुकिंग ब्रश ने लावणे). Image removed. प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटीग्रेड वर १५-२० मिनिटे भाजणे. Image removed. गरमा-गरम स्टफ्ड बन्स तयार...वरून थोडे बटर लावावे...मस्तपैकी चहासोबत खाण्याचा आनंद लुटा :) Image removed.

वाचन 4922 प्रतिक्रिया 0