सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने
माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्यात कैद केले.
१) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात.
२)धामणीची फुले
३) सोनमोहर
४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात.
५) जवळून यम्मी.
६) झाडावरच फुटलेल्या चिंचा
७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते.
८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ?
९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे.
१०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती.
११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला.
१२) शिवणीची फळे
१३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत !
१४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते.
१५) अजुन एक फुल की फळ ?
१६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता.
१७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती.
१८) बांडगुळाला धरलेली फुले.
१९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती.
२०) थोड जवळ जाउन बघा.
२१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे
२२) देवचाफाही जागोजागी दिसतो.
२३) शिशिराची फुले
२४) पेरूचे फुल
२५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो
अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्यात कैद करायचे आहेत.
लेखनविषय:
वाचन
10068
प्रतिक्रिया
0