खरी मजा आली ती तोडल्यावर!
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे,
नियमांविषयी!
त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले.
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :)))
आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम.
कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच!
मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे.
मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली.
मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम!
१. राँग साईडने(च) कॉलेज पर्यंत गाडी चालवणे. तीन जण बसवून!
२. मित्रांशी पैजा लावून दिवसात किमान २५ सिग्नल तोडणे.
३. ठरवून एका महिन्यात कोणतेही तिकिटच न काढणे. (अगदी थेटरचेही!)
४. मला(व कंपुला) बंक मरायचा असेल तर लेक्चररला रस्त्यातच थांबवून "महत्वाच्या शंका विचारणे" नंतर मित्रांनाही 'शंका विचारायला पाठवणे' व लेक्चर्स ना उशीर घडवणे! वर्गाला कुलुपच लावून ठेवणे. शिवाय कॉलेजच्या आवारात गाडी नेता यावी म्हणून रात्रीच गेटची कुलुपे कापून ठेवणे. (असे सहा-सात वेळा झाल्यवर त्याला वेल्डींगच मारण्यात आले, मग बिजागिर्यांच काढायची युक्ते करायला लागलो;) नंतर तर माझा एक मित्र खांबालाच धडकला मग पुढे 'गेटचे कोसळणे' अनिवार्य झाले.)
५. 'त्रास देणार्या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे
६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे
७. कचरा टाकला म्हणून कायदा हातात घेवून लोकांना बडवणे.
८. पावभाजीच्या गाडीवर काम करणार्या छोट्या मुलांना जास्त पैसे द्यावेत म्हणून मारामार्या करणे. गिर्हाईकांना जास्तीचे त्या मुलांना पैसे टीप म्हणून द्यायला'च' लावणे.
९. कटकट्या शेजार्यांची झोप खराब करणे (रात्री २ ते ३ या पहाटेच्या वेळातच मोठ्या आवाजात त्या शेजार्यांना आवडणारेच भजन् लावणे वगैरे पुण्याची कामे!)
१०. गप्पा मारायला म्हणून सिग्नलवरच गाडी लावून तासभर उभे राहणे!
११. पोलिसांशी अति वितंडवाद घालणे (यातून अनेकदा पोलिस मित्रच होवून गेले... मग मात्र नियम तोडणे फार अवघड वाटायचे!:))
१२. नो पार्कींग च्या पाट्यांवर पोस्टर्स चिटकवणे (किंवा चिटकवून घेणे!) (तेंव्हा जाहिरात क्षेत्रात होतो!)
१३. शाळेत पिटिच्या तासाला हटकून 'चमत्कारीक आवाज' काढणे. दुसर्या (इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत जावून मारामार्या करणे
१४. शाळेचा गृहपाठ वेळेवर न देणे व नंतर चमत्कृतीपूर्ण सबबींचा फायदा घेणे. (शेजारच्या काकूंना बाळ झाले त्यांना कुणी नव्हते म्हणून आईने चहा व डबा द्यायला पाठवले होते वगैरे डँबीस व धादांत खोटी कारणे देणे!;) )
१५. वर्गात सारखा त्रास देतो, अतिशंका विचारतो, म्हणून बाहेर कढल्यावर थेट मुख्यध्यापंकाकडे तक्रारी करणे व वाद घालण्याचा (नेहमीच अयशस्वी) प्रयत्न करणे.
१६. शिक्षकांनी मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा हात धरून ठेवणे. (हे नियम तोडणे नाहीये असे माझे सुप्रसिद्ध मत आहेच;) !) मोट्या वर्गात छड्या घेतांना चटकन हात काढून घेणे, मग एक मास्तर टेबल हात ठेवायला लावायचे, मी तिथुनही काढून घेतल्यावर टेबलावर आपटून त्यांचा रूळच तुटला व उडालेला तुकडा एका मुलाला लागला - रक्त आले, मग पालक आले... मग पुढे मोठेच प्रकरण झाले. पण छड्या बंद झाल्या!
१७. शिक्षा झालीच तर शिक्षकांच्या गाड्यांचे पेट्रोल गायब करणे. सकाळीच त्यांच्या गाडीत हवा नसेल असे पाहणे.
१८. रिक्षावाल्यांना सांगून ठेवून आकडू मुलींना कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यातच 'रिक्षा बंद पडली' असे म्हणून उतरवून देणे व पाई यायला लावणे. (लगेच त्याच रिक्षात आपण मात्र आरामात बसून येणे!)
वगैरे वगैरे वगैरे छोट्यामोठ्या गोष्टी. फार काही केले नाही हो! :))
शिवाय आपली कामे करून घ्यायला लाच देणे किंवा
कबूल करूनही ऐन वेळेला लाचच न देणे वगैरे गोष्टीही आहेतच. (आता हे नियम तोडणे आहे का हे माहीतनाही बॉ!)
असो, पण आता नाही हा करत असे काही! :)
आता गुंडोपंत मागचे दिवस आठवून नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतात.
जे "मला समजतील ते नियम" पाळण्याचाही प्रयत्न करतो.
मुळात "नियम म्हणजे काय" हा प्रश्न "सत्य म्हणजे काय" या प्रश्नाच्या अतिशय जवळ जाणारा आहे.
नियम हे जोवर सर्व लोकांच्या उपयोगाचे आहेत, तोवर ते पाळायला हवेत असे मी मानतो. (वरच्या उदाहरणात गुंडो अवखळ तरूण होते, आता नाहीत! ;) )
आताशा बहुतेक सर्व नियम पाळतो किंवा प्रामाणिक प्रयत्न तरी करतो. पण ते नियम तोडल्याशिवाय 'का पाळायचे' हे ही कळत नाही ना राव! (सिग्नल वर गाडी लावून गप्पा मारतांना एक मारूती अगदी उडवणारच होती आम्हाला... गाड्या पडल्या, आम्ही वाचलो! नि तो पळाला म्हणून वाचला!)
शिवाय निगोशिएटींग स्कील्स वाढतात! ओळखी होतात.
काय काय 'वाकू शकते' हे कळते 'काय मोडते पण वाकत नाही' हे ही कळते!
आपणही कधीतरी नियम तोडले असतील. काय होतेते नियम कसे तोडलेत आपण?
कोणते नियम योग्य वाटले कोणते मट्ठ?
काही अनुभव?
आपला
गुंडोपंत
(टीपः कदाचित लगेच उत्तरेद्यायला जमणार नाही कारण डोळे दुखतात नि खुप पाणीयेते जास्त वेळ संगणाकाचा वापरकेला तर... बहुतेक डोळ्यांचे सगळे नियम मी तोडलेत! :)) )
वाचन
30585
प्रतिक्रिया
0