पुरणपोळी होळी स्पेश्यल :)
मीली ने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे तरी सण म्हणून मीसुद्धा पुरणपोळी ची पा़कृ देत आहे. घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी :)
सावधान!! डाएट सांभाळणारी मंडळी कृपया गुळ किती, साखर किती, तुप किती असे म्हणू नये, सणावारा ला गोडाने सुरुवात करा, कॅलॅरीज मोजण्याने नव्हे ;)
साहित्यः
३ कप चणाडाळ
३ कप चिरलेला गुळ
२ टेस्पून साखर
१/२ जायफळ पूड करून
१ टीस्पून वेलचीपूड
अडीच कप मैदा+१/२ कप गव्हाचे पीठ
चिमूटभर मीठ
६ टेस्पून तेल
तांदळाची पीठी पोळ्या लाटण्यासाठी
पा़कृ:
चणाडाळ स्वच्छ धुवून बोटाचेपे शिजवणे.
शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घेणे.
ह्याला कट म्हण्तात.
एका पातेल्यात डाळ चांगली घोटून घेणे.
गुळ आणी साखर त्यात घालून एकत्र करणे .
पुरण आधी पातळ होईल सतत ढवळत राहीले के ते घट्ट होईल.
पुरण चांगले शिजले हे झारा/मोठा चमचा मधोमध उभा राहीला की समजते.
त्यात वेलची-जायफळपूड घालून नीट एकत्र करून पुरणयंत्रातुन वाटून घ्यावे.
हे झाले पुरण तयार.
मैदा+ गव्हाचे पीठ+मीठ+तेल घालून सैलसर भिजवावी. तेल-पाण्याने चांगले मळून घेणे.
२ तास कणीक भिजवल्यावर चांगली बत्त्याने कुटून घ्यावी व परत मळून घ्यावी.
मैद्यची पारी करून त्यात पुरण भरून , पारीचे तोंड नीट बंद करुन घेणे.
तांदळाची पीठी लावूना हलक्या हाताने पोळी लाटणे.
तवा मंद गॅसवर ठेवून पोळी घालावी .
सारखे उलटू नये, एकीकडून नीट भाजली / शेकली की दुसरीकडून भाजावी/ शेकावी.
गरमा-गरम साजुक तुपाबरोबर किंवा दूधाबरोबर खायला द्यावी.
कटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता.

वाचन
11813
प्रतिक्रिया
0