मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधसागर - धबधबा

अमोल केळकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
दुधसागर - मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल. दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते. गोव्यात गेल्यावर सागर किनारे, देवळे याचबरोबर वेळ असल्यास अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण. धबधब्याची काही चित्रे ( आंतरजालावरुन साभार)

वाचन 16708 प्रतिक्रिया 0