मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्ल्ड कप / पाकिस्तान /शिवसेना

विजुभाऊ · · काथ्याकूट
पाकिस्तान फायनला आल्यास शिवसेना वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून लावेल असा इशारा सेने ने पूर्वी दिलेला आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7513899.cms या पार्श्वभूमीवर यंदा सेनेची काय भुमीका असेल ? तसे घडायची शक्यता असल्यास ऐनवेळेस सामना इतरत्र हलवावा लागेल आणि तो मुम्बैचा तोटा असेल तसेच भारतीय क्रीडाक्षेत्राला एक बट्टा लागेल. हे टाळायचे असेल तर भारत सरकार/ महाराष्ट्र सरकार "बी सी सी आय" या खाजगी संस्थेचासाठी आपले पोलीसबळ वापरेल / निमलश्करी बळ वापरेल की आणखी काही करेल हे आत्ता सांगता येत नाही. त्या परिस्थीतीत भाजप आणि संघाची भुमीका काय असेल मुम्बैतील क्रीडारसिकानी कधीच पाकिस्तानी खेळाडूंचा विरोध केलेला नाही . इम्रानखान ,जावेदमियांदाद( तो मुबैकरांचा व्याही असूनदेखील) वासीम अक्रम ,वकारयुनूस यांचे नेहमी स्वतच केलेले आहे. राजकारण बाजुला ठेवुन सेना यावेळेस पाकिस्तानी खेळाडूंचे स्वागत करेल का? सेनेने पाकीस्तान टीम असलेलला अंतीम सामना होऊ दिला नाही तर त्याचा निकाल कसा लावला जाईल? समजा पावसामुळे किम्वा अन्य काही कारणामुळे अंतीम सामना होऊ शकला नाही तर निकाल कसा लावला जातो? ( एकही चेम्डू टाकला गेला नाही अथवा दुसरा संघ ब्यातिम्गच करु शकला नाही तर डकवर्थलुइस नियम लावता येत नाही त्यावेळेस)

वाचन 3864 प्रतिक्रिया 0