मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्रिवेणी - पहीला प्रयत्न

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
त्रिवेणी या गुलजारजीनी निर्माण केलेल्या नविन काव्यप्रकाराबद्दल (आता तसा जुना झाला आहे!) खुप वाचले. लिहायचा मोह झाला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहीती: तीन ओळी असतात. तिसरी ओळ ही पहील्या दोन ओळींना पुढे नेणारी किंवा कमालीचा विरोधाभास असणारी आणि ती वाचल्यानंतरच खरा दोन ओळींच्या मागे दडलेला अर्थ उमगावा अशी असते. १. आधी येतो पाऊस.. मग तुझी आठवण.. . . . अंती शिल्लक राहतो तो मृदगंधच... २. तू, मि, पाऊस.. सगळेच वेडे.. दाटून आले कि बरसतो.. . . . या वर्षी दुष्काळ फार लांबलाय... ३. तुझी माझी भेट जणू.. ओढाळ लाटेवर चांदण्याचा स्पर्श.. . . . लाटा अन् चांदणे दोन्ही स्पर्शातीत.... ४. पौर्णिमेच्या रात्री चंद्रचिंब तू.. मि मात्र पूर्ण गोंधळलेला.. . . . धरती अन् नभ यातील फरक शोधतोय... ५. डोळ्यातील 'हो'कार अन् ओठातील 'न'कार.. दोघेही असे काही भांडतात.. . . . जणू काय जुळ्यांचे दुखणे... ६. तुझी स्वप्ने अशी ओळीने ऊभी असतात.. मि झोपत नाही.. तरी वाट पाहत राहतात.. . . . बहुदा त्यांनाही आता सवय झाली आहे.. जागरणाची.. ७. एक शांत सरोवर अन् त्यात उगवतीचा सुर्य.. हं.. किती शांत वाटतय आता.. . . . अगं थांब इतक्यात मिटू नकोस ते डोळे... ८. लाटांवर लाटा किनार्‍याशी.. सागर नाहीच दोषी.. . . . माझ्याच पायाचे बहुदा दगड झालेत.... |- परीकथेतील राजा -| (१५/०९/२०१०)

वाचन 2280 प्रतिक्रिया 0