मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे लेख चोरले गेलेत !

मितान · · काथ्याकूट
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत. http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404 ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही. इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही ! मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे ! कोणती कारवाई करावी ? कशी ? कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.

वाचन 14317 प्रतिक्रिया 0