मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची पण पाकृ..! वॉलनट् -बनाना केक्/ब्रेड.. :)

प्राजु · · पाककृती
आजकाल शबरी लिहून डोकं जरा जडंच झालं होतं. दुसरं काही लिहायला सुचत नव्ह्तं. शबरीच्या पुढच्या भागांचे आराखडे तयार करताना स्वयंपाकात मीठ अंमळ जास्त होऊ लागलं तर कधी कमी! हे काही खरं नव्हे. तशी मी सुगरणच हो!! (असं फक्त माझं मत आहे:) ) तर म्हंटलं जरा पाकप्रयोग करावेत. आणि कसं झालं होतं, तो दुधी हलवा अंमळ जास्तच हिरवा झाल्यामुळे गणपा रागवला आहे आणि त्याने पाककृती लिहिणे बंद केले आहे. हा अन्याय कसा सहन व्हावा मला!! म्हंटलं भाऊ रागावला आहे.. जरा कहीतरी गोडधोड करून घालावं त्याला. नाही का? शिवाय, आंतरजालिय विश्वात स्वातीताई दिनेश, गणपा, पांथस्त(आज्-काल कुठे हरवले आहेत देव जाणे),जागु, गेला बाजार आत्ता नविन आलेले अपर्णा अक्षय, शुभांगी कुलकर्णी, पियुषा , आणि डायटिशियन असुनही खादाड असणारी अमिता... या सगळ्यांची मोनोपॉली जरा मोडून काढायची होती. ;) उगाच सुगरण्/बल्लव्वाचार्य आहोत म्हणून भाव मारतात सगळे. :) (सगळे हलके घ्यालच) तर.. स्वातीताई.. येस्स!! तुला कांपिटिशनला आलेच बघ. कोण म्हणतं प्राजुला स्वयंपाक येत नाही?? व्वा!तर हाच तो .. वॉलनट बनाना केक्/ब्रेड. (महत्वाची सूचना : पाकृ करावी आणि खावी स्वत:च्या जबाबदारीवर) IMG_8068" alt="" /> साहित्य : १. बटर : १ स्टिक २. मैदा : २ कप ३. अंडी : २ ४. वॅनिला इसेन्स : १ थेंब ५. साखर : १ कप ६. रंगाने, रूपाने आणि स्वभावाने(स्वादाने) परिपक्व झालेली केळी - २ ७. अक्रोड (फोडलेले): अर्धा कप ८. बेकिंग सोडा - अर्धा चमचा, बेकिंग पावडर - १ चमचा. ९. बेकिंग पॅन, ओव्हन आणि टूथपिक शिवाय ब्लेंडर्/हॅण्ड मिक्सी कृती : १. बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. ते रूम टेंपरेचर ला आले की फटावे. खूप फेटावे २. त्यात साखर घालून पुन्हा फेटावे. भरपूर फेटावे. (स्वातीताई अशीच लिहिते ना.. खूप फेटावे, भरपूर फेटावे :P) ३. अंडी फोडून त्यात घालावीत आणि पुन्हा भरपूर फेटावे. ४. आता हळूहळू मैदा(ऑल परपज फ्लॉर) घालत घालत फेटावे पुन्हा बेकिंग सोडा आणि पावडर घालून फेटावे. ६. वॅनिला इसेन्स घालून फेटावे. ७. केळी मिक्सर मधून एकदा ब्लेंड करून घ्यावीत. ८. केकच्या मिश्रणात हे केळ्याचे ब्लेंड घालून पुन्हा एकदा फेटावे. ९. ग्रिसिंग करून ठेवलेल्या बेकिंग पॅन मध्ये केकचे अर्धे मिश्रण घालावे. १०. अक्रोड (फोडलेलेच) थोडेसे भरड बारिक करून घ्यावेत. ११. हा अक्रोडाचा चुरा केकच्या मिश्रणावर सगळीकडे पसरून घालावा. १२. उरलेले मिश्रण पुन्हा या अक्रोडाच्या थरावर नीट पसरावे. वरून अक्रोड लावावेत. १३. ३०० फे. ला प्रिहीट केलेल्या ओव्हन मध्ये साधारण ३० - ४० मिनिटे बेक करावे. १४. टूथपिक केकच्या आत खुपसून पहावे. केक तयार झाला असल्यास ओव्हन बंद करावा आणि ३-४ मिनिटे केक तसाच ओव्हन मध्येच राहू द्यावा. १५. मग बाहेर काढून जाळीवर काढून घ्यावा म्हणजे वाफ धरणार नाही. केक पूर्ण गार झाला मस्त एक पीस कट करावा आणि कुल व्हिप असेल तर त्या पीस वर घालून खावा. IMG_8067"> IMG_8070" alt="" /> IMG_8069" alt="" /> आहे ना रेशिपी भन्नाट! आमचा केक काही अप साइड डाऊन नाहीये बुवा!! :) आम्हीही करतो बरं केक अण्ड बेक. आमच्या इथे त्सेंटा आजी नसल्या तरी आम्ही करतो केक आणि खातो सुद्धा. कॉफी केक सुद्धा केला होता तो ही सावर क्रीम घालून!उगाच या वरच्या सगळ्या मंडळींना कॉप्लेक्स येईल म्हणून नाही टाकली रेसिपी.!! काय मंडळी.. येताय खायला?? विशेष सूचना : गणपाने प्रथा पाडल्यामुळे उगाच सगळे पाकृ वाले स्टेपबाय स्टेप पा कृ देतात. माझा केक नीट होईलच अशी खात्री नसल्याने स्टेप्स चे फोटो काढले नाहीयेत. ही सुद्धा मोनोपॉली मोडली मी.. येस्स!! ज्यांना त्या स्टेप्स बघायच्या असतील त्यांनी स्वतः करून बघाव्यात. ;) वॉलनट- बनाना सुफळ संपूर्ण!! (थोडीशी कमी सुगरण) प्राजु

वाचन 9357 प्रतिक्रिया 0