
सोया पुलाव
सोयाबीन क्युब्स हा नॉनवेज ला एक पर्याय आहे असे म्हणतात (मला नक्की माहित नाही )
असो ........
सोयाबीन क्युब्स, पाऊन किलो तांदूळ ,हिरवे मटार,कांदा उभा चिरलेला ,टोमाटो चीरलेल, हि. मिरची पेस्ट १-२ चमचा आल-लसून पेस्ट १ चमचा ,बिर्याणी मसाला १/२ चमचा ,तूप (तेल) मोठे २ चमचे ,मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर ,खडा मसाला दालचिनी ,तेजपत्ता ,मीर ,लवंग ................
कृती ;- सोयाबीन क्युब्स ५-६ मिनिट कोमट पाण्यात भिजवा ,ते स्पोन्जी होऊन फुलून येतील , तांदूळ अर्धा शिजवून घ्या .
कढइत २ चमचे तूप घाला ,खडा मसाला घाला ,कांदा घाला गुलाबी परतून घ्या , आल लसून आणि मिरची पेस्ट घाला ,छान मिक्स करून घ्या
आता टोमाटो आणि हिरवे मटार घाला ,बिर्याणी मसाला ,आणि मीठ घाला ,आता अर्धे शिजलेले तांदूळ घाला ,छान परतून मग सोयाबीन क्युब्स घाला आणि शिजण्यापुरत पाणी घाला कोथिंबीर घाला बस .६-७ मिनिटात पुलाव रेडी टू इट.
(टीप ;-सोयाबीन क्युब्स पाण्यात भिजल्याने स्पोन्जी होतात ,जास्त शिजले तर आकार चपटा होईल म्हणून तांदूळ अर्धा शिजवून घ्यावा )
सुकी भाजी :-

सोयाबीन क्युब्स ,कांदा बारीक चिरलेला ,मटार ,लाल तिखट १/२ चमचा ,टोमाटो बारीक चिरलेला ,चिकन मसाला १/२ चमचा ,गरम मसाला १/२ चमचा ,मीठ ,कोथिंबीर
सोयाबीन क्युब्स ५-६ मिनिट कोमट पाण्यात भिजवा ,ते स्पोन्जी होऊन फुलून येतील ,त्यातील पाणी पिळून घ्या .
कृती ;- कढइत २ चमचे तेल घाला जीर मोहरी हिंग घाला ,तडतडल्यावर कांदा परतून घ्या ,मटार ,लाल तिखट घाला ,टोमाटो घाला छान परता
आता चिकन आणि गरम मसाला घाला ,मीठ घाला आणि सोया क्युब्स घाला, मस्त मिक्स करा वरून चिरलेली कोथिंबीर घाला .तय्यार...

