मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोहाळ्याचे सान्डगे

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-१)उडिदाची डाळ २)कोहाळा ३)मिठ ४)हिन्गपूड ५)धण्याचा भरडा. ६)हिरवी मिरची चवीप्रमाणे ७)हळद कृती :-१)उडदाची डाळ भिजत घालून ४-५ तास ठेवावी. २)रात्री बारिक वाटून घ्यावी.वाटताना पाणी बेताचे घालावे. ३)कोहाळा किसून घ्यावा व वर वजन ठेवावे. ४)पाणी निघून गेले की वाटलेल्या डाळीत मिसळावा. ५)त्यात मिठ,हळद,हिन्गपूड व थोडा धण्याचा भरडा घालावा. ६)हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घालाव्या. ७)सर्व एकत्र कालवून त्याचे सान्डगे प्लासटीकवर घालावे. खडखडीत वळले की भरून ठेवावे. अश्याप्रकारे मी सान्डगे घरी करते हे नुसते खोबरेल तेलात तळून सुद्धा छान लागतात्.तसेच ह्याची कोशिम्बीर पण छान लागते.एप्रिलमध्ये करणार त्यामुळे आज फक्त पा.कृ.टाकते आहे.

वाचन 5056 प्रतिक्रिया 0