मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शेवयाची खिचडी

मुलूखावेगळी · · पाककृती
शेवयाची खिचडी ही पौष्टीक, डायट फुड आनि वन डिश मील आहे. साहित्य- १ वाटी शेवया १ कान्दा बारिक चिरललीला २-३ मिरच्या मूठभर शेन्गदाणे १/४ वाटी मुगाची डाळ भिजवलेली (असल्यास) तेल्,जिरे,मोहरी,मीठ्,ह्ळद क्रुती- गॅस ऑन करुन त्यावर कढइ ठेवा. त्यात शेवया टाकुन त्यात थोडेसे तेल टाकुन त्या भाजा.रन्ग ब्राउन येइपर्यन्त भाजा. Image removed. आता ताटात काढुन ठेवा कढइमधे तेल टाका आनि तापल्यावर मोहरी-जिरे टाका. आता मिरची आनि कान्दा टाका. कान्दा परतत आल्यावर त्यात मुगाची डाळ भिजवलेली टाका. आनि ५ मिनिटे झाकन ठेवुन वाफ येउ द्या. मूग शिजल्यासारखे झाले असतिल तर त्यात मीठ्,हळद टाका. आता त्यात १ वाटी पानी टाका आनि त्याला उकळी आल्यावर भाजलेल्या शेवया टाका. झाकन ठेवुन सगळे पानी आटुन जाउ द्या. होत आल्यवर किन्वा ताटात वाढ्ताना १ चमचा चान्गले तुप टाका जास्त छान लागते. आता ताटात घेउन पोटात जाउ द्या Image removed.

वाचन 6179 प्रतिक्रिया 0