अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत
जर्मन बेकरी बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा हिमायत बेग याला येरवडा कारागृहात वाचण्यासाठी कुराण, वर्तमानपत्र द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश उषा ठाकरे यांनी दिला.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका बॉम्ब स्फोटाने १७ निष्पापांचा जीव घेतला आणि ५०-६० लोकांना जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्जा हिमायत ऊर्फ युसुफ बेग याला (७ महिन्यांनी) अखेर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने पुणे येथून अटक केली.
पुढे येरवड्यातील न्यायालीन कोठडीत असताना ह्या अतिरेक्याने हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्याला वाचायला कुराण हवे आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज पुण्यात येरावाड्यापासून कोथरूडला जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी बॉम्ब हल्ला करून आता तुरुंगात ऐश-आरामात जीवन जगत आहेत.
मला एक समजत नाही, कुराण हा एक पवित्र ग्रंथ आहे. १७ जणांचे जीव घेतलेल्या नराधमाला सरकार असे कसे काय कोणता धार्मिक ग्रंथ सोपवू शकते ? कुराण वाचून त्या 'बेग' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? तो काय सगळ्या अतिरेकी कारवाया सोडून धार्मिक मार्गाला लागणार, कि अजून काही त्या ग्रंथातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ?
एखाद्या अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक बम डालेंगे, मरे तो जन्नत, बचे तो मजे कि जिंदगी'
हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हा देश म्हणजे 'अतिरेक्यांना पोसण्याचाच एक देश' बनून राहील असे वाटते. हा भारत देश सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी ?
वाचन
7551
प्रतिक्रिया
0