एकाच राज्याची एकांगी प्रगती होणे निषेधार्थ असो.
गुजरात चे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदीना कुणीतरी आवरले पाहीजे.
सर्व महानगरपालीका चे निकाल लागले आणि प्रचंड मताधिक्याने परत त्यांनाच निवडून दिले. सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत.
अहमदावाद मध्ये झालेले बदल आश्चर्य कारक आहेत.
कसे चिकट्वायचे याचे मार्गदर्शन करावे.
----
काही उपाय सुचवावेसे वाटतात.
१. ही प्रगती सोहराबुद्दीन (एक आतंकवादी) याच्या हत्येकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून मुद्दाम घडवून केलेली आहे उद्देश शुद्ध नसल्यामुळे हे कौतुक हे अस्थायी आहे. (पुण्यातील बिआरटी ची जाहीरात का होत नाही? इतकी चांगली बससेवा केवळ जाहीरात नाही म्हणून मागे पडते आहे.)
२.भारताची अशी एकांगी एकाच राज्याची प्रगती होणे गैर आहे.त्यामुळे पुण्याचे विद्यमान खासदार ना त्या राज्याचे प्रभारी नेमावे
३.शक्य असेल तर ३५६ कलम लावून राज्य बरखास्त करावे.
४. गोध्रा लोक विसरत आहेत त्याची आठवण करून द्यावी.
५.सर्वात महत्वाचे म्हणज यापुढे कोणत्याही उद्योगला गुजरात मध्ये परवानगी देउ नये.
६. नानो प्रकल्प त्वरीत बंगाल ला शिफ्ट करावा.
७. गुजरात ची जाहीरात करण्यासाठी आलेल्या खर्चाची पूर्ण चौकशी करून मोदिना शिक्षा हो इ पर्यंत वेगळ्या वेगळ्या केसेस .....अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत लढावे शेवट एकच मोदीना शिक्षा. बास
८. महाराष्ट्र, बिहार या राज्यांची प्रगती होई पर्यंत गुजरात मध्ये कोणत्याही प्रगती वर बंदी घालावी.
९. बरखा दत्त,वागळे यांना खास भत्ता देउन सर्व प्रकरण खोदून काढावे. अशी आज्ञा द्यावी.
एका जातीय वादी नेत्याला इतके महत्व देणे चुकीचेच आहे.
कळावे लोभ असावा.
वाचन
7352
प्रतिक्रिया
0