अप्रतिम चवीचे mediterranean salad - तबूले (tabouleh)
साहित्य :
१ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)
१ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली
१ वाटी बारीक चिरलेला पुदीना
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ वाटी बारीक चिरलेली काकडी
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
मीठ चवीपुरते
३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी)
२-३ चमचे लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे
कृती:
१) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे.
२) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे.
३) लिंबाचा रस घालावा.
४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे.
५) प्लेट मध्ये घेउन serevr करावे किंवा स्वतः खावे.
**
खुप छान colourful दिसते.
चव वेगळी पण मस्त लागते.
पोट्भरीचे आणि fibres , carbs, vitamins,anti-oxidents भरपूर असल्याने अतिशय nutricious salad आहे.
वाचन
5699
प्रतिक्रिया
0