मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दहीबुत्ती

मितान · · पाककृती
रावणपिठले, शेवभाजी अशा जळजळीत आणि झणझणित जेवणात शेवटी दहीबुत्ती असली की पोटात कसे गार वाटते ! अशी ही माझी आवडती दहीबुत्ती- सामग्री : - भात दही फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अर्धा चमचा उडीद डाळ, तेल किंवा तूप. कृती: १ वाटी तांदळाचा भात शिजवून घ्यावा. थोडा गार झाल्यावर त्यावर दीड वाटी दही भातावर पसरून घावे. फोडणी तयार करताना मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता तडतडू दयावा. गॅस बंद करून त्यात उडीद डाळ घालावी. ती गुलाबी रंगाची झाली की ही फोडणी दह्यावर घालावी. अगदी खाण्याच्या वेळी चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालावी. थोडी तिखट चव हवी असल्यास फोडणीसाठी गरम केलेल्या तेलात वाळलेली लाल मिर्ची किंवा तळणी मिर्ची तळून घावी. ती कुस्करून भातात घालावी. हा भात थोडावेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यावा. जास्त छान लागतो. :) Image removed. फक्त हेच जेवण असेल तर मी यात किसलेली काकडी पण मिसळते. आणि पाहुण्यांसाठी असेल तर कोथिंबीरी सोबत डाळिंबाचे दाणे पेरून सजवते. काल कोथिंबीर आणि डाळिंब घरात नव्हते म्हणून साधाच केला. त्याचा फोटो तुमच्यासाठी.. :)

वाचन 9153 प्रतिक्रिया 0