मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंब्याचे मोदक

नेहरिन · · पाककृती
गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांचा वेगवेगळ्या पाककृती देत आहे. आंब्याचे मोदक सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्था चमचा साजूक तुप पारीसाठी साहीत्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी, अर्धा चमचा मीठ, पाणी Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तुप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे. एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. ५ मिनीटाने गॅस बंद करावा. ५ मिनीटाने त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा घेउन त्याला वाटीचा आकार द्यावा. Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> यात एक चमचाअ सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा. तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत. Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> Image removed.Image removed.From आंब्याचे मोदक" alt="" /> (फोटो- चिंतामणी पळसुले)

वाचन 22654 प्रतिक्रिया 0