मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात्री अचानक झोप उडाली होती प्रखर झोतात खोली होते काय नाही समजले शुभ्र किरणांनी घट्ट बांधले सरसर नेले वरती ओढून दिले एका कक्षात टाकून बघतो अघटीत काय जाहले सभोवती बहु लोकची दिसले धावलो बाजुला माणूस पाहुन विचारण्या कोठे आलो आपण नव्ह्ती भींत तरी अडकलो त्याच्यापाशी नाही पोहोचलो विचारले ओरडून मी त्याला कसला आहे विचीत्र मामला बहुदा त्याने नाही एकले म्हणून मी निरखूनी पाहिले खुर्चीवरती होता बसला प्रकाश रज्जुने बांधला हात दोन्ही उंचावलेले दंडामधुनी रक्त खेचले घाबरून मी पाही सगळे चारी दिशा मानव पसरले कोणी धावत्या पट्ट्यावरती कोणी होते उलट लटकती बाब अचानक कळली सारी प्रयोगशाळा होती न्यारी जाणण्या संपूर्ण मानुष होते प्रयोग सुरू अमानुष माझे काय? घाम फुटला प्रश्न लगेच तो ही सुटला खेचून बसवले खुर्चीवरती टोप आवळला डोक्यावरती मी ओरडलो सोडा मजला मस्तकात आवाज उमटला नको घाबरू देऊ सोडून प्रयोगास आधी संपवुन काय प्रयोग, का धरले मजला? विचारले अदॄष्य जेलरला त्याच क्षणी माथ्यात सणक आवाजे फटकारला चाबुक हातपाय ते कसे चालती तुझ्या मेंदुच्या आद्न्येवरती जाणल्यावरी सोडू तुजला उपयोगही नाही आम्हाला अमानुषांनो सोडा मजला मी आहे मानव एक भला नाही बांधील ह्या प्रयोगाला नाही हा अधीकार तुम्हाला करता असले क्रोधित ताडन मनात बोले कुणी अमानव मार्ग मानवानेच दाखवले उंदरावरचे प्रयोग पाहिले विद्न्यानाच्या प्रगती साठी इकाटीनीच्या सुयशासाठी क्षुद्र मानव उंदीर आमुचे वापरले संकेतच तुमचे करू पूर्ण अमुच्या कार्याला पिंपात बुडवून टाकू तुम्हाला इकाटीनीच्या तळघरात ढेर पिंपात मेले ओल्या उंदीर तळटीप "इकाटीनी" हजारो प्रकाशवर्षे दूरवरून आलेली जमात.

वाचन 3555 प्रतिक्रिया 0