मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लव्ह युवर जॉब. डु यु?

मराठमोळा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी. आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल? कदाचित नाही, किंवा माहित नाही. गप्पांमधे तर्क वितर्क लढवणे एक वेळ जमेल पण एकट्यात स्वतःला हा प्रश्न विचारला तर उत्तर देणे कठीण होवुन बसते, अर्थात आज सगळं सुरळीतपणे चालु आहे म्हणुन असे प्रश्न पडतात, एखाद्या गरीबाला/मागच्या पिढीला (पुन्हा व्याख्या व्यक्तीसापेक्ष ;) ) हा प्रश्न विचारला तर कदाचित त्याला हा प्रश्न समजणार सुद्धा नाही. असो.. खरं तर किती मध्यमवर्गीय लोकांना हा प्रश्न पडतो? किंवा पर्याय निवडायला वाव असतो/वेळ मिळतो?. भारतात बहुतांशी प्रत्येक जण शिक्षण घेतो केवळ चांगली नोकरी मिळवण्याकरता, मला काय करायला आवडतं हे जाणण्यासाठी पुरेशी साधनं/ज्ञान आजुबाजुला असायलाही हवीत ना, आणि जेव्हा कळतं तेव्हा वेळ हातातुन निसटुन गेलेली असते, अर्थात पॅशन (मराठी शब्द?) साठी वयाची मर्यादा नसते पण मग कंफर्ट झोनचे काय? बायको मुलं आहेत, जबाबदारी आहे, सन्यास नाही घेऊ शकत. मग काय करावं बरं? अशा वेळी लोकं तथाकथित प्रगत देशांकडे बघतात, चुक की बरोबर हेही माहित नाही. खुपच गुंतागुंतीचा हजारो डायनॅमिक व्हेरिएबल असलेला हा प्रश्न आहे खरा, पण याचं उत्तर शोधणं सुद्धा गरजेच आहे, नाही का? की नाही? जे चाल्लय ते गोड मानुन रहाव? आपला, (या सर्व प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात असलेला) मराठमोळा

वाचन 7415 प्रतिक्रिया 0