प्रारब्ध
लेखनविषय:
वेचले जे क्षण सुखाचे, ते मुळी नव्हतेच माझे
पाहिले स्वप्नात माझ्या सौख्य ते नव्हतेच माझे !
आजही डोळयांत माझ्या, स्फुंदते हासू तुझे रे
पण तुझ्या डोळ्यांत होते, चित्र ते नव्हतेच माझे !
राहिले लाख प्रश्न मागे, लाख आली उत्तरे
उत्तरे आली जयांची, प्रश्न ते नव्हतेच माझे !
हाय ! अता जाऊ कुठे रे फाटक्या ह्रुदयासवे ?
गुंतले मम प्राण जेथे-तव ह्रुदय-नव्हतेच माझे !
एवढी रडले सख्या मी, आसूही रक्ताळले
गाली लाल-रक्तिमेचे प्रारब्धही नव्हतेच माझे !
~पल्लवी~
वाचन
3433
प्रतिक्रिया
0