मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्रिन चिकन

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: १ किलो चिकन साफ करुन धुवुन २ बटाटे फोडी करुन ग्रिन मसाला वाटण - मिरच्या १० (तिखटाच्या आवडीवर अवलंबुन) कोथिंबीर २ मुठ, पुदीना १ मुठ, आल १ इंच, लसुण ८-१० पाकळ्या. हिंग, हळद, चवीप्रमाणे मिठ १ लिंबु गरम मसाला १ चमचा तेल क्रमवार पाककृती: प्रथम धुतलेल्या चिकनला वरील वाटण, मिठ, हिंग, हळद, एक लिंबाचा रस चोळून घ्यावे व अर्धा तास मुरवत ठेवावे. Image removed. मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. Image removed. मग सगळ एकत्र करुन वाफेवर चिकन शिजु द्यावे. शिजल्यावर गरम मसाला टाकुन परत एक वाफ आणून गॅस बंद करावा. Image removed. अधिक टिपा: बटाटे जरुरी नाहीत. आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. मी बटाट्याचा वापर पुरवठ्यासाठी करते. ह्या चिकनला कांद्याची गरज नसते. तरीपण आवडत असल्यास वाटणातच घातला तरी चालेल.

वाचन 6178 प्रतिक्रिया 0