मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मासे ११) बांगडा

जागु · · पाककृती
Image removed. Image removed. मालवणी प्रकार : लागणारे साहित्य: बांगडे ४-५ थोड ओल खोबर, १ चमचा धणे, ३-४ तिरफला ठेचुन ७-८ लाल सुक्या मिरच्या ५-६ लसुण पाकळ्या १ छोटा कांदा चिरुन अर्धे हळकुंड मिठ चविपुरते थोडा चिंचेचा कोळ तेल पाककृती: बांगड्याला खवले नसतात त्यामुळे साफ करायला सोपे असतात. बांगड्याच्या कालवणासाठी पोटातील घाण काढायची, शेपुट व डोके काढून टाकायचे. बांगड्याचे दोन ते तिन तुकडे करायचे. तळण्यासाठी हवे असतील तर छोटे बांगडे पोटातील घाण व शेपुट काढून मध्ये मध्ये चिरा देउन स्वच्छ धुवुन त्याला थोडे मिठ व चिंचेचा कोळ लावुन ठेवायचे. प्रथम ओल खोबर, कांदा, हळकुंड भिजवुन फोडून, धणे, लाल मिरच्या, लसुण घालुन वाटण करायचे. मग तेलावर ह्या वाटणाची फोडणी देउन ठेचलेले तिरफला, चिंचेचा कोळ(गरजे नुसार पाणी घालून) घालायचा एक उकळ आणायची नंतर त्यात वरुन बांगडे घालायचे, मिठ घालायचे व ३-४ मिनीटे उकळवुन गॅस बंद करायचा. तळण्यासाठी बांगड्यांना आल लसुण पेस्ट, मसाला, हिंग, हळद, मिठ व थोडा चिंचेचा कोळ लावुन मुरवावेत मग बेसन किंवा रवा लावुन तळावेत. अधिक टिपा : धणे नसतील तर कोथिंबीर चालेल. कोणतेही मासे ३ पाण्यातुन स्वच्छ दुवावेत कापल्यावर. हळकुंड जरा आधीच भिजत घातले तर चांगले. हळकुंड नसतील तर १/२ चमचा हळद चालेल पण ती चव येत नाही.

वाचन 10786 प्रतिक्रिया 0