मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमची पहिली परदेशवारी..........................१

विलासराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी , पहिलाच परदेश प्रवास असल्यामुळे जी काही मित्रमंडळी परदेशी आहेत,त्यांच्याबरोबर चर्चा करुन प्राथमिक माहीती घेतली...आणी विजासाठी अर्ज केला आणी विजा मिळाला. जायची तयारी सुरू झाली. कुणी सांगीतले म्हनुण फरसाण, काजु, मनुखे,बदाम्,विविध चॉकलेट्,लोणचे,पापड असे अनेक खाद्यप्रकार बरोबर घेतले.मैत्रिणिसाठी भारतिय ड्रेस घेतले,प्रवासी बॅगसुध्दा नविन घेतली कारण कधी अशी वेळच आली नव्ह्ती. असो..... गावावरुन ४-५ मित्र आले जोरदार पार्टी झाली,प्रत्येकाने आपापल्या परिणे मोलाचे मार्गदर्शन केले जरी ते कधी परदेशी गेले नव्ह्ते.रात्रि १:५० चे विमान होते, निघण्यापुर्वी स्काईपे वरूण मैत्रिणीशी बोललो आणी खात्री करुन घेतली की कितीही आणीबाणी आली तरीही तीने माझ्या आगमनापुर्वी साओ पावलो विमानतळावर हजर रहावे.कारण मी माझा भ्रमणध्वनी नेणार नव्ह्तो म्हनुन.दोन टॅक्सी घेउन आम्ही ८ जण गिरगावातुन निघालो तेव्हा रात्रिचे १० वाजले होते.सोसायटीकडे एक नजर टाकली जसा मी कधीच परतणार नव्ह्तो.......आणि निघालो.मित्र मस्करी करत होते पण माझे तिकडे लक्ष नव्ह्तेच मुळी.मी जे काही करतोय ते बरोबर कि नुसताच वेडेपणा चाललाय असा विचार मनात डोकाउन गेला..आणी माझ मलाच ओशाळल्यासारखं वाटले.अशा विचारातच विमानतळावर पोहोचलो.मित्रांशी गप्पा आटोपत्या घेउन विमानतळामधे प्रवेश केला .सामान जमा करण्यासाठी रांगेत दाखल झालो.....ईतक्यात एक अधिकारी माझ्याकडे आला ....तिकीट , पासपोर्ट तपासले आणी चौकशी करू लागला. अधिकारी: कुठे चाललात? मी: ब्राझिलला. अधिकारी: कशासाठी? मी: फिरण्यासाठी. अधिकारी:३ महीने ?......इथे काही कामधंदा नाही का? मी: आहे साहेब,माझं ऑफीसच कामकाज माझा भाऊ बघणार आहे. ईतक्यात दुसरा अधिकारी तेथे आला ..दोघे काहीतरी बोलले .......परिणामी मला रांगेमधून बाजुला घेण्यात आले.माझे बॅगमधील सर्व सामानाची कसुन तपासणी केली गेली.आनी परत....... अधिकारी: एवढे खाद्यपदार्थ का घेऊण जाताय? तिकडे काही मीळत नाही का? मी: ३ महीने रहायच आहे आनि आपले पदार्थ तिकडे मीळत नाहीत साहेब...... अधिकारी:हुं....आनी ही व्हिस्की ? मी: तिकडच्या मित्रांसाठी....(खरं तर माझ्यासाठीच. असावा आपला ब्रॅंड म्हनुन) तब्बल दीड तासांनी मला सोड्ण्यात आले.एवढ्च सांगतो कि एखाद्या अतिरेक्यासारखी माझी चौकशी झाली.बॅग जमा करुन,तपासणी यंत्राची परीक्षा पास झालो.....जोराचा श्वास घेतला...जराशी बरं वाटले आनी आतिल दुकानामधे ऊगाचच डोकावत हळुह्ळु पुढे निघालो.येथील श्रिमंती थाट बघुन मलातरी परदेशात आल्यासारखे वाटले. मी फक्त वस्तुंच्या किमति पाहुन समाधान मानले( काय करणार?)......अन जरा रमतगमतच गेटवर पोहोचलो..परत एकदा बॅग तपासणी झाली ...विमा नात जाउन बसलो.मित्राना फोन केला ,हकिकत सांगितली अनि मला पहिल्यांदाच गहिवरुन आले ........तसाच निरोप घेतला... २ बाय २ सीटवर खिड्कीजवळ बसलो.थोड्या वेळाणे एक मध्यम वयाच्या बाई आल्या...अनि त्यांनी खिड्कीजवळच्या जागेवर दावा केला. मी खात्रि करुन त्यांना जागा देउन बाजुच्या सिटवर बसलो. मनातच ट्रॅव्हल एजंटला शिव्यांची लाखोली वाहिली कारण त्याने मला खिड्कीजवळची जागा बूक केल्याच सांगितले होते.असो मी स्वतः खात्रि न करताच बसलो आनी आमचा पोपट झाला.विमानाने टेक ऑफ घेतला....मी खिड्कीतुन खाली पाहिले...काळोख अन खाली दिव्यांच्या प्रकाशात ऊजळलेली मुंबई.....केवळ अप्रतिम नजारा!!!!!! थोड्या वेळाने नाश्टा आला.. यथेच्च समाचार घेतला, नंतर काही वेळाणे ड्रिंक्स आले ,न लाजता ३-४ टिन बियर प्यायलो..अन दीली ताणुन.सकाळी ८ वाजता अ‍ॅमस्टरडॅमला उतरलो....फ्रेश झालो ..२:३० तास वेळ होता. सुंदर विमानतळ अनि त्याहुन सुंदर तिथल्या मुली बघत गेट्वर आलो. पुढील विमान वेळेवर निघाले.आता माझी जागा खिड्कीजव़ळ होती.विमानाने टेक ऑफ घेतला....मी खिड्कीतुन खाली बघितले .......बराच वेळ तो कापुस पींजल्यासारखा नजारा अन खाली नि़ळाशार समुद्र..कॅमेरा नसल्याची खंत वाटली. सवयीने परत ३-४ टिन बियर प्यायलो ,पोट्पुजा केली ...अन झोपी गेलो..थोड्या वेळात जाग आली...बियरने आपली जात दाखवली......माझ्या शेजारी एक जर्मण माणुस अनि पलिकडे ब्रझिलियन बाई ...दोघांनी उठायच तेव्हा आमी १ नंबरला जाणार....एकदा दोनदा असं दर अर्ध्या तासाने ४-५ वेळा जाव लागले...१-२ वेळा हसुन मला जाऊ देणारे माझे शेजारी खाऊ की गिळू असे नजरेनेच सांगु लागले.आता मनाशिच ठरवले परत विमानात बियर प्यायची नाही.(फुकट आसली तरीही). आताशा जरा बरे वाट्ले....विमान ३३००० फुटावरुन चालले होते...खिड्कीतुन खाली बघितले अजुनहि फक्त पाणीच दिसत होते.......दुरदुरपर्यंत जमीन दिसत नह्वती... घड्याळात ३ वाजलेले......आत्तापर्यंत काहीसा बिनधास्त असलेला मी मनातुन घाबरलो....मनात अचानक विचाराच काहुर ऊठ्ले.......अन केव़ळ चॅट वरची ओळख असताना एका अनोळखी व्यकतीला भेटायला मी १७००० कि.मि.च्या प्रवासाला निघालो होतो....मला मी केलेल्या धाडसाची भीति वाटायला लागली...एकाही मित्राला माझ हे धाडस आवड्ल नव्हते......जवळजवळ सर्वांना खात्रिच होति की माझा पोपट होणार........अचाऩक मला तिचा चेहरा आठवला .......माझा हरवलेला आत्मविश्वास परत आला....जरासा सावरलो ...जर ती भेटली तर तो माझ्यासाठी ए॓तिहसिक क्षण असणार होता.......मी मनातच त्या भेटीची ऊजळणी केली....अनि शान्त चित्ताने एक झपकी मारली.....अनाऊन्समेंट झालि ..मला जाग आली.. काय बोलली ती बाई एक शब्दही समजला नाही..कुठ्ली भाशा आहे ते पण नाही समजल.६:३० वाजले होते ......१ तास बाकी होता.....फ्रेश झालो ......कॉफी घेतली .....कसलासा फॉर्म भरायला दिला अनो़ळखी भाशेत .....पुन्हा शेजारी ऊपयोगी पडले.....जे जे त्यांनी सांगितले तसे डोके गहाण ठेवुन लिहिले. मला तर मी निरक्षर आहे असेच वाटले.......लॅडींगची सुचना झाली अनि विमान सुखरुप उतरले......चालत चालत पुढे आलो.......ईथे एका सुंदर मुलीने हसुन स्वागत केले......दोन मधील एका रांगेकडे बोट दाखवले......एक रांग स्थानिक लोकांची अनि दुसरी आमची परप्रांतियांची ......पुढे आलो बॅग कुठे मीळतील हे विचारले ....समोरचा माणुस काय बोलला काहीच समजले नाही....जे माझ्या विमानातले प्रवासी होते त्यांच्या मागे चालु लागलो.एवढ्या गर्दीमधे मला बॅग सापडेल हे अशक्यच वाट्ले.१० मिनिटातच गुलाबि रंगाची रिबीण बांधलेली बॅग दिसली .......दोन्हि बॅग घेतल्या .......लोकल फोनवर नंबर एडी चा मोबाईल नंबर फिरवला......फोनमधली बाई काय बोलत होती काहिच कळेणा.......रात्रिचे ९ वाजलेले.....१० वेळेला फोन लावला असेल पण पलिकडुन ओळखीचा आवाज आला नाही...ए़का माणसाच्या हातात भारतिय पासपोर्ट पाहिला धावत जाऊण त्याला गाठ्ले.....त्याने टेलिफोन चे कार्ड घ्यायला सांगितले.मी त्याला मदतिची विनंति केली , त्याने कारण सांगुन पोबारा केला....संपलं सगळं....शेवटी देवावर हवाला ठेवुण बाहेर जायचा निर्णय घेतला......कधी फारसा देवावर न विसंबणारा मी पण आठवतील तेवढ्या देवांची नावे घेत बाहेर आलो....समोर बरीच गर्दी दिसत होती .......जरा बाजुला होऊन शोधाव असा विचार आला ईतक्यात झपकन एक लाल टी शर्ट घातलेली आक्रुती आली .......मला काही कळायच्या आत त्या आक्रुतीने मला मीठी मारली अन मी भानावर येईपर्यंत तिने माझे चुंबनही घेतले होते.........होय ती एडीच होती.....माझा २४ तास प्रवासाचा शिण नाहीसा झालेला.तिच्याकडे एकदा बघितले ...........आयुश्यात पहिल्यांदाच डोळ्यातुन आनंदाश्रु आले......बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला ......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते..... क्रमशः........... . . .

वाचन 30873 प्रतिक्रिया 0