मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालेभाजी - अंबाडी

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: १ जुडी अंबाडीची पाने धुवुन चिरुन पाव वाटी तांदळाची कणी पाव वाटी तुरडाळ १ गड्डा लसुण ठेचुन ३-४ लाल मिरच्या राई, जिर, हिंग, हळद मिरचीपुड १ चमचा चविपुरते मिठ थोडा गुळ तेल पाककृती: कुकरमध्ये तेलावर लसणाची फोडणी देउन त्यात लाल मिरची, राई, जिर, हिंग, हळद घालुन त्यावर कणी, तुरडाळ व चिरलेली भाजी घालावी मग गरजेपेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. त्यात मिरची पुड, मिठ, गुळ घालावा. आणि कुकरला २ ते ३ शिट्ट्या द्यायच्या. झाली तयार अंबाडीची आमटी Image removed. आंबोळी यांच्या मागणीवरुन.

वाचन 6818 प्रतिक्रिया 0