संस्कृत - असंस्कृत
लेखनप्रकार
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. तसेच लेखातील भाषा "फक्त प्रौढांसाठीच" हा इशारा. आक्षेपार्ह वाटणारं असेल तर कृपया येथूनच परत फिरा.)
गेल्या काही दिवसात संस्कृत, संस्कृती ह्यावरून काही चर्चा होतीय. प्राचीन भारतात प्रगती, ऐहीकसूख वगैरे वगैरे. अजून एका चर्चेत स्त्रीवाद, समानता, लैंगीकता, विचारस्वातंत्र्य, प्रकटन, मु़क्तभावनाविष्कार वगैरे वगैरे.
एका आचार्यांनी सांगीतलेल्या श्लोकावरून सूचलेले अजून एक स्फूट.
********************************************
नारी स्तनद्वयनाभिप्रदेशम|
दृष्ट्वा मा गा मोहावेशम |
एतन्मांसवसादि विकारम |
मनसि विचिन्तय वारंवारं |
भज गोविन्दम भज गोविन्दम | गोविन्दम भज मूढमते |
(साधारण) अर्थ : स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.
*****************************************
माझ्या मनात स्वभावीक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तिने शेकडो वर्षांपुर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तिला सांगीतले असावे. सामान्य माणसाला शंकराचार्यांनी असे अनैर्सगिक सांगीतलेत तर तो त्यांना तोंडावर नाही पण पाठीमागे नक्कीच वेड्यात काढेल. बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. सामान्य माणसाच्या ते शब्दश: कधीच पचनी पडणार नाही.
स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की जर का कुणालाही कळणार नाही (एकदम गुप्त), मनसोक्त इंद्रीयसुखाशिवाय त्यातून इतर काही गुंतागुंत होणार नसेल तसेच आपल्या व समोरच्या व्यक्तिच्या ते मनाविरुद्ध नसेल तर असे शारिरि़क संबध उपभोगायला आवडतील का नाही? जे काय उत्तर येईल त्यावरून कळेल की Resistance is totally futile. शतकानुशतके हे चालु आहे व बहूतेक राहीलच. बहूतेक अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. स्त्रियांना देखील पुरूषदेहाचे तितकेच आर्कषण निर्सगाने बहाल आहे पण जननक्षमता बिग बिग फॅक्टर. ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. क्वॉलीटी ओव्हर क्वॉंटीटी. स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. (विकृतीचा अपवाद वगळता)
बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. जिथे कामशास्त्राची निर्मीती झाली. वेगवेगळ्या संस्कृत काव्यातून शृंगाराची बहार आली, स्त्रीचे मोहक अंग दिसेल अशी वेशभूषा असलेली आपली संस्कृती एकदम लाजेच्या सुनामी लाटेत कशी मुक्त किनार्यावरून दरीत, डोंगरमाथ्यावर अडकली? थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? इतिहासाच्या वेगेवेगळ्या टप्प्यावर स्त्री पुरूष संबध, मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची वैयक्तिक आयुष्य पहाता शरीरसंबध हा शब्द एकाच वेळी अत्यंत आर्कषक काहीतरी किंवा अरेरे हे असे काय (जर तुम्ही त्या संबधातील नायक नायीका असाल / नसाल) अश्या परस्परविरोधी भावना कशा काय बरे उत्पन्न करते.
जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? अश्या आर्कषणाचे भान, धुंदी ही योग्य रितीने मुलामुलींच्या अंगवळणी पडेल व विशेषता त्यातील तोटे, अयोग्य त्यांना समजेल असे जाणिवपूर्वक प्रयत्न (सामाजिक जबाबदारीने) व्हायला हवेत कितपत होतात ?
लैंगीक शिक्षण फार मोठी गोष्ट झाली. मला आठवतेय नात्यातल्या, शेजारच्या वयस्कर महीलांच्या नजरेतून व तोंडून लिपस्टीक, स्लीव्हलेस ब्लाउज घातलेल्या तरूण बाईकडे पहाताच टोमणा निघायचाच. ते सोडा, साधा अंगभर गाऊन घालणे हे देखील काहींना मान्य नव्हते. असे असेल तर विषयसुखाकडे निकोपतेने बघणे किती अवघड असेल.
स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? नवर्या-बायकोने एकमेकांना नावे ठेवणे हा वैवाहीक जीवनाचा महत्त्वाचा भाग मानले गेले आहे का? लहान मूले अनुकरणाने शिकतात. मोठी माणसे इतर मोठ्या माणसांना दिसणार नाही असे भांडतात पण स्वतःच्या मुलांसमोर हे बिनधास्त भांडतात. त्याचा मुलांवर मोठेपणी परीणाम होत असेल का?... अगदी आत्ताचे उदाहरण म्हणजे चांगले शिकलेले, सुखवस्तू, परदेशात रहाणारे लोक, बायका नवर्यांच्या व नवरे बायकांच्या कागाळ्या इतरांकडे (माझ्याकडे ;-)) करताना पाहीले आहे. मी व बायको अश्या लोकांच्या घरी जायचे असेल तर थट्टेत म्हणतो बर आज तु माझ्याबद्दल असे सांग, मी तुझ्याबद्दल हे सांगू का?
आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्याचदा असूयेने) निकाल देत असतो.
शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? जसे वय वाढते तसे लक्षात येते की आर्थीक, सामाजीक जबाबदारी नसताना खूप प्रिय असलेला "विषय" जरा वयानूसार मागे पडतो. सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. मुले बाळे, बायको, घर एक नियमीतता ह्याचे देखील व्यक्तिला खूप आर्कषण येते. फॅमीली, कुटूंब ह्या सारखे उत्तम टॉनीक नाही असे वाटते. तरूण असताना जगाशी झुंजाल पण जखमी झालात तर कोणीतरी हवे ही भावना कुटूंबाचे आर्कषण अजूनच वाढवते.
माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहाणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. २५ वर्ष पुर्ण झाल्यावरच लग्न केल्याने भारताची लोकसंख्या वाढ थोड्याप्रमाणात तरी कमी करू शकू, स्वतःच्या आयुष्याच्या कल्पना, स्वप्ने पुरी करू शकू. जरा परखून जोडीदार निवडू शकू. स्वतःचे आयुष्य थोडे तरी सुखी करू शकू.
पण खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल.
प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्या व्हाव्या असे वाटते. पण बर्याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड.
वाचन
35105
प्रतिक्रिया
0