मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ|| उचल तुझे हात नको भिऊ आता आपूलाच जय होईल सीमेत शिरता झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१|| राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२|| पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर* उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३|| * महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.) - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०७/२०१०

वाचन 5529 प्रतिक्रिया 0