"....तुझे देख के मेरी मधुबाला.....!!!!"
लेखनप्रकार
एका धाग्याच्या संदर्भात नुकतेच दोन ज्येष्ठ सदस्य "मधुबाला" विषयावर चर्चा करत होते ते मी वाचले आणि एका योगायोगाची आठवण झाली.
मी आज असे म्हणायचे कारण म्हणजे नवी दिल्ली इथून माझ्या एका मित्राने या स्वप्न सुंदरीचा ई-मेल ने पाठविलेला फोटो. तसे आंतरजालावर मधुबालाचे शेकड्यांने फोटो उपलब्ध आहेत, पण त्याला अचानकच तेथील एका व्यक्तीच्या खाजगी संग्रहात हा फोटो मिळाला. वर दिलेला फोटो कुठल्याही चित्रपटातील नसून आपण जसे घरगुती कार्यक्रमासाठी एकत्र जमतो त्यावेळी सहज छंद म्हणून कुणाचे तरी फोटो घेत असतो, त्या धर्तीचा हा एक फोटो. या पेक्षा नक्कीच अधिकचे फोटो त्या व्यक्तीकडे असतील पण तोपर्यंत तरी या फोटोची लज्जत काहीतरी वेगळीच म्हणून त्याने दोनतीन दिवसापूर्वी मला पाठवला. या निमित्ताने अजूनही "हिच्यासम हीच" या उक्तीची आठवण झाली.... आणि मला आठवले की आपण मोठ्या पडद्यावर हिचा एकमेव चित्रपट पाहिला तो म्हणजे "मुघल-ए-आझम" तोही बराच गाजावाजा करून काढलेली "संपूर्ण रंगीत" प्रत म्हणून. त्यावेळीदेखील मित्रांसमवेत केलेली चर्चा आठवली की खरच "ब्लॅक अँड व्हाईट" च्या जमान्यात काय वेड लावले असेल या शुक्राच्या चांदणीने सार्या रसिकांना! त्यानंतर डीव्हीडी मिळवून मधुबालाचे गाजलेले जवळपास सर्व चित्रपट आम्ही एकत्रित पाहिले. त्यात अर्थातच "चलती का नाम गाडी". "मिस्टर अँड मिसेस ५५", "काला पानी", "बरसात की रात", "अमर", "संगदिल", "झुमरू". तर क्वचित अचानक टीवी वर एकदा "फागुन" आणि "हावरा ब्रीज" हे चित्रपट पाहायला मिळाले. पण जे कोणत्याही स्वरूपात पाहायला मिळाले नाहीत त्याबद्दल अजूनही वाईट वाटते ~ उदा. "महल", "राजहट", "गेटवे ऑफ इंडिया", "इन्सान जाग उठा" इ. नंतर ज्येष्ठ लोकांच्या बरोबरीतील बोलण्यातून तसेच कोल्हापुरातील "टीएफटी" चर्चा माध्यमातून हिच्याबद्दल बरीचशी माहिती मिळत गेली, लेख, पुस्तकेही वाचनात आली.... अन हळूहळू कळायला लागले की "मधुबाला" ने आपल्या सहजसुंदर हसण्याने, दैवी रूपाने अगदी १९५० पासून भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कशी प्रकारची मोहिनी घातली होती.
या निमित्ताने आपल्या संस्थळावर तिच्याविषयी थोडीशी माहिती. अर्थात बहुतांशी सदस्यांना या 'सुंदरी' विषयी चांगली/बर्यापैकी माहिती असणारच, तरीदेखील एक "नोस्ताल्जिया" स्वरूपात हा एक छोटासा लेख.
दिल्ली येथे पठाण कुटुंबात १४.२.१९३३ रोजी जन्म ... मूळ नाव "मुमताज"... एकूण पाच बहिणी... वडिलाचा पोटापाण्याचा खास असा व्यवसाय नसल्याने घरी कायम आर्थिक ओढाताण. त्यामुळे लौकिक अर्थाने मधुबाला कोणत्याही शाळेत गेली नाही, साहजिकच शिक्षण शून्य. (पुढे मुंबईला आल्यानंतर चित्रपट जगतात बर्यापैकी जम बसायला लागल्यानंतर खाजगी शिकवणीने वाचनाची सवय करून घ्यावी लागली कारण "संवाद पाठ करणे" जरुरीचे होते. पण "लिखाण" नावाचा प्रकार कधीच हिच्या बोटांना भावाला नाही... चित्रपटांचे करार देखील हिच्यावतीने वडिलच करायचे त्यामुळे हिने आयुष्यात कधी "स्वाक्षरी" तरी केली असेल का नाही ही शंका आहे.) सर्व कुटुंब घेऊन अताऊल्ला खान (वडील) त्या वेळेच्या रिवाजानुसार मुंबईला आले (अर्थात "पोटासाठी मुंबई" हा प्रकार उत्तर भारतात कायमचाच आहे...असो)... कामासाठी स्टुडिओच्या चकरा सुरु झाल्या. त्यावेळी ही पाच वर्षाची अत्यंत देखणी अशी बाल कलाकार म्हणून देविका राणी यांनी तिला "बेबी मुमताज" या नावाने पुढे आणले. पुढे नायिका वयाच्या १४ व्या वर्षीच झाली. नायक होते राज कपूर. "मधुबाला" असे नामकरणदेखील देविका राणी यांनीच केले. मात्र हिंदी सिने जगतात "स्टार" चा दर्जा मिळाला "महल" मुळे. (याच चित्रपटामुळे "मधुबाला" आणि "लता मंगेशकर" घराघरातील नाव झाले ~ "आयेगा आनेवाला" कारणाने.)
मग दिलिपकुमारचे (जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा होता...) हिच्या आयुष्यात आगमन.... मग ते बहुचर्चित पण असफल प्रेम प्रकरण.... यशस्वी चित्रपटांची नायिका म्हणून सर्वत्र कौतुक, पण बापाचा घरी प्रचंड दरारा असल्याने मनात असूनदेखील ही आपल्या प्रेमासाठी "टिपिकल हिंदी सिनेमा" धर्तीचे बंड करू शकली नाही.... मग ठरलेले वैफल्याचे जगणे... बाप आणि बहिणी यांच्यासाठी "मधुबाला" म्हणजे नोटा छापण्याचे मशीन असल्याने तिने त्या घरातून निघून जाणे म्हणजे बाकीच्यांनी उपाशी मरणे हेच होणार असल्याने कावेबाज बापाने ती "बिनलग्नाची"च राहील असेच पाहिले. मात्र ज्यावेळी तिने किशोरकुमार बरोबर लग्न केले तो पर्यंत तिचे शरीर ह्रदय विकाराने पोखरले होते व चित्रपटात काम करणेदेखील जवळपास बंद झाले होते. किशोरकुमारच्या अगोदर या ना त्या माध्यमाने तिने दिलीपकुमार समवेत "ते नाते" पुन्हा प्रस्थापित व्हावे असे बरेच प्रयत्न केले, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, याला कारण दिलीपकुमारला "नया दौर" दरम्यान झालेला कोर्ट खटल्याचा ताप व ते सर्व मधुबालाच्या हट्टामुळे झाले ही समजूत घेऊन त्याने तिच्या नावावर मारलेली फुली. किशोरकुमार बरोबरचे लग्न ही बाब दोघासाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती जिचे अंतिम रूप त्यांना माहित होते. ह्रदयविकारामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे तो हर्ष देखील तिला कधीच मिळणार नव्हता.
निम्मी, नादिरा आणि संगीतकार नौशाद अशी तीन चार मंडळीच तिला मित्र म्हणून लाभले होते. लग्नानंतर अधेमध्ये केव्हातरी नौशाद यांच्या घरी ती ये-जा करायची. अशाच एके दिवशी नौशाद पतीपत्नींनी तिला नैराश्याने रडताना पाहिल्यावर किशोर बरोबर फारकत घेण्याचा सल्ला दिला व पुनश्च नव्या जोमाने चित्रपटात येण्याचा आग्रह केला, पण फुलात तो जोम आता राहिला नव्हता. नौशादना उत्तर म्हणून तिने फक्त एक "शेर" ऐकीवला :
"जब कश्ती साबित-ओ-सालीम थी
साहिल कि तमन्ना किसको थी ?
अब ऐसी शिकस्त कश्ती में
साहिल कि तमन्ना कौन करे ?..."
खरं आहे, शेवटपर्यंत मधुबालेला "किनारा" मिळालाच नाही आणि वादळार नाव भरकटतच राहिली....आणि दि. २३.२.१९६९ ला वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी या "शुक्राच्या चांदणीचा" लोप झाला.
काही गोष्टीबाबत म्हणताना, वाचताना आपण अनुभवतो की "होतील बहु, असतील बहु... पण हिच्यासम हीच..." ~ मधुबालाला हे वर्णन अचूक लागू होते. जितकी वर्षे सिनेमाच्या मायावी दुनियेत ती होती, तितकी वर्षे तिने "घर ते स्टुडिओ व काम संपल्यानंतर परत घरी...." हाच दिनक्रम अंगिकारला होता. कोणत्याही सभा समारंभाला जाणे नाही. फिल्मी पार्ट्यात सामील नाही....मुलाखती, फोटो सेशन नाही. चित्रपटांच्या "प्रिमियर" ना हजेरी नाही. (अपवाद फक्त "इंसानियत" चा. ~~ बाकीचे राहू दे पण "मुघले आझम" च्या प्रिमियरला झाडून सारी हिंदी सिनेसृष्टी हजर होती, पण ही "अनारकली" ने मात्र घरीच राहणे स्वीकारले); सीने मॅगेझिन्स पासून दूर... त्यामुळे कोणत्याही "सो-कॉल्ड अॅवॉर्डस" देणार्या संघटनांनी तिला अवार्डससाठी कधीच "पात्र" मानले नाही. 'फिल्म फेअर' ने तर "मुघले आझम" देशभर गाजत असताना आणि मधुबालेच्या अनारकलीला जनतेने डोक्यावर घेतले असतानाही जाणीवपूर्वक "सर्वोत्कृष्ट अभिनेत्री" चा त्या वर्षीचा पुरस्कार "बिना रॉय" या अभिनेत्रीला "घुंघट" या चित्रपटासाठी दिला होता. पण याचे वैषम्य वाटण्याच्या पलीकडे मधुबाला गेली होती. तिला एवढेच माहित होते की सारा देश तिच्यावर प्रेम करतो....आणि त्यांचे प्रेम हाच तिच्या नजरेत सर्वोच्च सन्मान होता.
भारतच काय पण हॉलीवुडपर्यंत हिच्या "दैवी सौंदर्य" ची कीर्ती गेली होती. जगप्रसिद्ध दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन तिला हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते...पण इथेही तिचा तो बाप आडवा आलाच. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप लिखाण केले. १९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की, "Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills."
नर्गिसनंतर भारतीय टपाल खात्याने "तिकीटा" चा मान दिला तो केवळ "मधुबाला" या खर्याखुर्या अप्सरेला !! ते हे तिकीट ~~

वाचन
16294
प्रतिक्रिया
0