मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुधी हलवा

प्रभो · · पाककृती
दिपालीताईने परवा दुधीचे पराठ्याची पा़कृ टाकली, आमचं तोंड खवळलं... आता असं नाही की मला दुधीचे पराठे आवडतात..आवडतो दुधीचा हलवा. तर पेश करतो आहे दुधी हलवा. साहित्य : १. १ दुधी - धुवून आणी साल काढून. २. २५० ग्रॅम खवा किंवा २ मोठे ग्लास दुध ३. ३-४ चमचे साजूक तूप ४. ८-१० मोठे चमचे साखर ५. सजावटीसाठी काजू, बदाम, बेदाणे. कृती: सर्वप्रथम साल काढलेला दुधी किसून घ्या. एका नॉन स्टीक पातेल्यात अथवा लोखंडी कढईत ३-४ चमचे साजूक तूप घ्या. तूप गरम झालं कि त्यावर दुधीचा किस टाका. दुधीचं सगळं पाणी अटेपर्यंत हालवत रहा. पाणी अटल्यावरही २ मिनिटे दुधी खरपूस होईपर्यंत भाजा. आता त्यात खवा हाताने चुरून टाका. खवा नसल्यास २ मोठे ग्लास दुध टाका. हे मिश्रण मध्यम आचेंवर हालवत अटवा. दुध पुर्णपणे अटल्यावर त्यात साखर घाला. सगळं मिश्रण एकजीव होऊ द्या. थोडा वेळ अटवा. थंड झाले की वरून काजू-बदाम-बेदाण्यानी सजवून खा. (हा हलवा गरम गरम खायलाही मस्त लागतो.) बनवण्यासाठी वेळ : एक ते सव्वा तास. Image removed.

वाचन 8550 प्रतिक्रिया 0