मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेवती संपादकपदी विराजमान..

विसोबा खेचर · · काथ्याकूट
राम राम मिपाकरहो, कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे.. मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे. अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे. ती त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती..:) बाकी संपादकीय कामात आमची ढवळाढवळ नाही व नसेल.. त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू.. असो, रेवती यांना मिपाचे संपादकपद पूर्ण जबाबदारीने सांभाळण्याकरता अनेकानेक शुभेच्छा.. तात्या.

वाचन 22923 प्रतिक्रिया 0