मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२२ जून १८९७

मराठे · · काथ्याकूट
काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रीमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती. ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.) पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही. तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.

वाचन 14368 प्रतिक्रिया 0