मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग २

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
शेवटी एकदा ठरल्याप्रमाणे "पुणे" हे स्थळ नक्की झाल्यावर पुढचा प्रश्न आला की "पुण्यात कुठशीक ?". आता ह्या प्रश्नावर पुण्यातल्या लोकांनी बोलायचे नाही तर कुणी ? लगेच "कार्यकारणीची" एक तात्काळ मिटिंग बोलावण्यात आली. सलामीचे २-४ पेग पोटात गेल्यावर "अल्ट्रा माइल्ड्स धूर" सूडत धमाल्यानं पहिला बॉल टाकला "ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे ...". तिकडे लगेच "आनंदयात्री" डॉक्टरसाहेबांच्या कानात कुजबूजला "तुला कळतयं का डेक्कन का म्हणतय़ं हे बेणं ? म्हणजे काय दिवसभर हा संभेलनाची तयारी या नावाखाली इथल्या पोरी टापत बसणार व रात्री बसल्यावर मी आज काय काय बघितलं याच वर्णन करून आपल्या डोक्याला झीट आणणार." त्यावर ते दोघे व आसपासचे अजून २ जण ख्या ख्या करून खिदळाय लागल्यावर नक्की काय होतयं हे धमाल्याच्या लक्षात आले व तो म्हणाला " मां की किरकीरी साला, इथं आम्ही च्यायला दिवसरात्र हिंडून व बोंबलून घश्याची वाट लागली आणि हे खिदळतात " आता विनोबा पण काहितरी वार करणार जे जाणून तात्यांनी "गपाकीरे फोकलीच्यांनो " म्हणून परिस्थीती नियंत्रणात आणली. जमेल तसे दऱ्या-खोऱ्यात हिंडणाऱ्या "जुन्या अभिजीताने" एकदम जोशात म्हणले " नाही, मी काय म्हणतो, समजा आपण हा कार्यक्रम लोहगड, सिंहगड अशा ठिकाणी ठेवला तर ?" त्यावर केशवसुमारांनी पण " सिंहगडाच्या पायथ्याशी बंगला भाड्याने घेउ" असा सल्ला दिला. त्यावर विनोबांनी लगेच " महाराजांनी जिवापाड जपलेल्या स्वराज्याच्या एका साक्षिदाराच्या अंगणी असले प्रकार मला चालणार नाहीत" अशी धमकीवजा सूचना केली. आता ह्याचा परिणाम व एकंदरीत "नांगरे पाटलांचा दरारा" या गोष्टी लक्षात घेउन शेवटी कुठल्याही प्रकारचे "गड" हा प्लान पण ड्रॉप करण्यात आला. शेवटी गावाच्या गर्दीपासून दूर एखाद्या ठिकाणी, निवांत जागी स्थळ फिक्स करायचे ठरले. पुणे शहरातील हॉटेल्स चे रेट्स व आजकाल "विकएंन्ड्ला पुणेकरांनी घरात चूल पेटवणे बंद" केल्यामुळे हॉटेलात होनारी गर्दी व आपण जेवताना पाठिमागे रांगा लाउन उभारणारे पुणेकर यांच्यापासून सुटका म्हणून "सातारा रोडवरचे एक खोपच्यातले हॉटेल" ठरवण्यात आले. त्यावर शेखरने आपण एकदा नळस्टॉपच्या इथे "शांग्रिला गार्डन" च्या वर कशी गरम पेयाची पार्टी केली होती व तिथे कसा कोनाचाही डिस्टर्ब होत नाही याचा दाखला दिला. त्यावर "विवेक" म्हणाला " राजे, आपण पिउन झाल्यावर बाकी कुणाला व घरच्यांना डिस्टर्ब न करता शांतपणे जाउन झोपलात तरी मिळवली...". आता या दोघात वाजण्याची चिन्ह दिसत असताना विनोबांनी शेखरला "पेग भर, मग बोलू" म्हणून शांत केले. शेवटी एकदा सगळे ठरल्यावर मिटिंगमधली "सावरकर" मंडळी बाकीच्या " डोलकरांना" घेउन मार्गस्थ झाली.... शेवटी तो महान दिवस उजाडला, ठरलेल्या वायद्याप्रमाणे देशोदेशीचे सरदार पहिल्या "मिसळणारोहण समारंभासाठी" पुण्यनगरीत जमा झाले. मागच्या वेळी "कल्टी मारलेल्या" छोट्या डॉनला यावेळी "अबब" ने मानगूट पकडून धरून आणले होते. तरी त्याचे माझा "गुजरात दौरा, माझा गुजरात दौरा" असा घोषा चालूच होता त्यावर विनोबांनी त्याला " राजे, पुणे काय आणि गुजरात काय, सगळे आपलेच हिंदवी स्वराज्य आहे" अशी समजूत काढली. त्यावर एकवेळ "प्राजूच्या चारोळ्या" परवडल्या पण असले "नाटकात किंवा दशावतारीत भाषण केल्यासारखे बोलणे नको" असा विचार करून "अरे काय आंद्या, किधर है ?" असे म्हणत तिथून काढता पाय घेतला. तेवढ्यात "डांबिसकाका" सगळ्या 'यक्षनगरीतल्या मिपा ग्रामस्थांना" घेउन तेथे अवतीर्ण झाले. त्यासाठी त्यांनी खास "चार्टर्ड फ्लाईट" केल्याचे समजले. त्याबद्दल त्यांना विचारताच ते म्हणले " तर मग, काय समजलात, मी काय घाबरतो की काय ? आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. " बाहेर कसला येवढ़ा गलाबला चालला म्हणून ते बघायला स्वता: तात्यासाहेब बाहेर आले, बघतात तो समोर डांबिसकाका. मग काय विचारता महाराजा , जवळपास १० मिनिटे दोघांनी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" एकमेकांची विचारपूस केली. हा "अनूपम सोहळा" पाहून अनेकांना गदगदून आले. दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या त्यावर धमाल ने त्यांच्याकडे "काय बावळट ध्यान आहे?" अशा अर्थाने पाहिले त्यावर शरमून त्या दोघांनी वह्या मिटल्या. तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती. अशा गप्पा मारत ती मंडळी हॉलकडे चालू लागली. वाटेतच स्वागतमुर्ती इनोबा उभे होते, बेसनलाडू कडे पाहून ते म्हणाले "राजे सावकाश, पडताल; इथे आपल्या अमेरिकेप्रमाणे सरकते जिने नसल्याने पाय घसरण्याची शक्यता आहे..." त्यावर चिडून बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले. तिकडे समस्त महिला मंडळाच्या नेहमीप्रमाणे गप्पा चालू झाल्या "ए काय म्हणतीस? अय्या काय मस्त साडी आहे. क़िति जाड झाली आहेस, डाएट बंद केलेस का ? बाकीच काय म्हणतेस ? ती बघ कसा शहाणपणा करती आहे,झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...." तर अशा रितीने संभेलानासाठी सर्व मंदळी एकत्र आली ... आता संभेलनात काय घडले हे पुढच्या भागात .... क्रमशः [ खरच सॉरी राव, रात्रीचे १२ वाजले. आता झोपायलाच हवे ...]

वाचन 7367 प्रतिक्रिया 0