संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन)
व्हेज मान्चुरीअन ची बरीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे मला सुद्धा ही रेसिपी द्यावीशी वाटली.
साहित्यः
मान्चुरीअन:
१ कप कोबी,गाजर्,फ्लॉवर् बारीक चिरून
१ च. बारीक चिरून हिरवी मिरची
१ च.चिरून लसूण
३ टे.स्पून मैदा
२ च. कॉर्नफ्लॉअर
१/२ टे.स्पून तेल
१/४ च. मिरपूड
१/४ च. अजिनोमोटो
१/४ च.व्हिनेगर
१/४ च. सोयासॉस
३/४ च. मीठ
वरील सर्व साहित्य एकत्र करून मान्चुरीअन तेलात तळून घेणे.
ग्रेव्ही: २ टे.स्पून कॉर्नफ्लॉअर
१ सपाट टे.स्पून सोयासॉस
१/२ च.अजिनोमोटो
२ च. साखर
१ च.मीठ
३/४ च. व्हिनेगर
१ सपाट च. चिलीसॉस
१टे.स्पून तेल
३/४ टे.स्पून हिरवी मिरची
१टे.स्पून लसूण
१.च्.चिरून आलं
१. ग्रेव्ही साठी प्रथम २ कप पाण्यात कॉर्नफ्लॉअर,सोयासॉस, अजिनोमोटो, साखर, मीठ्,व्हिनेगर, चिलीसॉस घालणे.
२.१ टे.स्पून तेलावर, हिरवीमिरची, लसूण, आलं परतणे वरील तयार पाणी (नं.१) घालून २ मि.उकळणे.
३.मान्चुरीअन घालून २ मि. उकळणे चवीनुसार मीठ घालणे. वरून कांदापात घालून फ्राईड राईस बरोबर सर्व्ह करणे.
वाचन
9318
प्रतिक्रिया
0