मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कुठे भास होतो मला 'कोंकणाचा')

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;) कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे... हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे? 'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे.. रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे? तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे? लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी.. अशाने गुटुर्गू करावे कुठे? तुटे पाठ माझी सुजे तोंड भलते व्रणाच्या मिषाने उरी राहिले तरी का असे नेहमी होत जाते... दिसावी कुणी, पाघळावे कुठे ! घराच्या तिच्या चोरट्या पायवाटा बुजू लागल्या रोज रात्रीमधे.. अशा काळरात्री पहार्‍यात 'वासू', तुझ्या डाळिने त्या शिजावे कुठे? मला आकळेना हिला प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे मिळाले कुठे? (गुन्हे जे कधीचेच केले तयाचे हिने शोधले हे पुरावे कुठे?) नवा माल असली दिसे आजच्याला अनिर्बंध आनंद 'रंग्यास' दे उडावे कवीने? उडावे कशाला? उडावे किती अन् उडावे कुठे... -चतुरंग

वाचन 5292 प्रतिक्रिया 0