मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिकन फहिटा

स्वाती२ · · पाककृती
इथे आल्यावर पहिल्यांदी चाखलेला मेक्सिकन पदार्थ म्हणजे चिकन फहिटा. स्पॅनिशमधे 'J' चा उच्चार 'ह' होतो हे महित नसल्याने ' हे फजिटा काय आहे' अस विचारुन स्वतःची फजिती करुन घेतलेली आजही आठवते. मात्र माझ्या फजितीला कारण झालेला हा फहिटा त्याच्या चटकदार चवीमुळे माझा लाडका आहे. खरा फहिटा हा बीफचा स्कर्ट स्टेक हा भाग येतो त्या पासून करतात. पण माझ्या सारख्या बीफ न खाणार्‍यांसाठी चिकन फहिटा हा प्रकार आहे. या चिकन फहिटा साठी लागणारे महत्वाचे साहित्य म्हणजे चिकन मुरवायला लागणारे मॅरिनेड. तुम्ही बाजारात मिळणारे तयार मॅरिनेड वापरू शकता पण घरी बनवलेल्या मॅरिनेड सारखी चव नाही मिळणार. माझ्याकडे मॅरिनेडच्या दोन कृती आहेत. तेव्हा पसंद अपनी अपनी मॅरिनेड -1 १/४ कप बीअर १/३ कप लिंबाचा रस १ टे. स्पून तेल २-३ मोठ्या लसणाच्या पाकळ्या(देशी असल्यास जास्त), पेस्ट करुन १ टे. स्पून वुस्टरशर सॉस १ टी स्पून जीरे पावडर २ टे. स्पून चिरलेली कोथिंबिर १ टी स्पून ब्रऊन शुगर १/२ टी स्पून तिखट १/२ टी स्पून मिरे पावडर चवीप्रमाणे मीठ सर्व एकत्र करुन मिक्स करा किंवा मॅरिनेड -२ १/४ कप वुस्टरशर सॉस १/४ कप सायडर विनेगर १ टी स्पून जिरे पावडर २-३ मोठ्या लसणाच्या पाकळ्या(देशी असल्यास जास्त), पेस्ट करुन १/२ टी स्पून तिखट १/२ टी स्पून मीठ १ टी स्पून मिरे पावडर २ टे. स्पून बारीक चिरुन कोथिंबीर सर्व एकत्र करुन मिक्स करा. फहिटा साहित्य २ बोनलेस चिकन ब्रेस्ट १ कांदा उभा चिरुन १ लाल किंवा हिरवी ढब्बू मिरची उभी चिरुन १-२ टे स्पून तेल मॅरिनेड-१ वापरणार असाल तर १ टे. स्पून वुस्टरशर सॉस १/२ टी स्पून लिंबाचा रस १/२ टी स्पून तिखट २ टी स्पून पाणी एकत्र करुन मॅरिनेड-२ वापरणार असाल तर त्यातलेच निम्मे मॅरिनेड त्यात १ टी स्पून तिखट घालून बाजूला ठेवा. ६ ६- इंच वाल्या टॉटिया जोडीला आवडी प्रमाणे चिरलेला लेट्युस १/२ कप किसलेले चिज १/२ कप सॉवर क्रिम ग्वाकोमोल साल्सा किंवा पिको डे गायो कृती चिकन तुमच्या आवडीच्या मॅरिनेड्मधे २ तास मुरवत ठेवा. Image removed. पुरेसे मुरले की ग्रील करुन घ्या. किवा कास्ट आयर्न च्या पॅन मधे १ टे. स्पून तेल घाला. चांगले तापले की त्यात चिकन घाला. Image removed. ४-५ मिनिटे एकाबाजुला शिजले की उलटा ४-५ मिनिटे शिजू द्या. कापून मधे चिकन गुलाबी नाहियेना ते बघा. असल्यास अजून थोडा वेळ शिजवा. बाजूला काढुन ठेवा. मोट्या पॅन मधे १ टे. स्पून तेल तापत ठेवा. चांगले तापले की त्यात उभा चिरलेला कांदा घाला. ३-४ मिनिटे परता. आता त्यात चिरलेली ढब्बु मिरची घालून ४-५ मिनिटे परता. Image removed.Image removed. एकीकडे चिकनच्या पातळ पट्ट्या कापा. पॅन खालची आच वाढवा. बाजुला ठेवलेले मॅरिनेड किंवा सॉस्,लिंबू रस, पाणी हे मिश्रण घाला. पॅन चांगले गरम असेल तर सिझल होईल. लगेच चिकन घाला आणि २ मिनिटे परता. Image removed. मायक्रोव्हेव मधे ओलसर पेपर नॅपकिन मधे गुंडाळून टॉर्टिया २५-३० सेकंद गरम करा. Image removed. टॉर्टिया मधे चिकनचे मिश्रण आणि आवडीप्रमाणे लेट्युस, चिज, सॉवर क्रिम वगैरे घालून फहिटा बनवा. Image removed.

वाचन 7816 प्रतिक्रिया 0