मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अप्पे आणि चटणी

श्रद्धा. · · पाककृती
साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ,एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव,३/४ मिरच्या, ६ लसुण पाकळ्या ,१ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर मीठ चवीप्रमाणे... कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे करायला घ्यावेत. (हे अप्पे करण्याचा वेगळा तवा मिळतो.) खोबर्‍याची चटणी मिक्सर वर वाटुन घ्यावी. अप्पे गरम गरमच खावेत. Image removed.

वाचन 18461 प्रतिक्रिया 0