मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवसेनेचा 'आयबीएन लोकमत'वर हल्‍ला

मड्डम · · काथ्याकूट
मुंबई शिवसेनेवर कार्यक्रमातून व बातम्यांमधून टीका केली जात असल्‍याच्‍या आरोपावरून शिवसेनेच्‍या काही कार्यकर्त्‍यांनी 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीच्‍या कार्यालयावर जोरदार हल्‍ला करून या वाहिनीच्‍या कर्मचा-यांना व संपादक निखिल वागळे यांना जोरदार मारहाण केल्‍याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. 'आयबीएन-लोकमत' या वाहिनीच्‍या आजचा सवाल या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे हे शिवसेनेवर वारंवार टीका करत असतात असा आरोप करून सुमारे 40 ते 50 शिवसैनिकांचा जमाव या वाहिनीच्‍या मुंबई कार्यालयावर चालून आला. यावेळी त्‍यांनी वाहिनीच्‍या कार्यालयात काम करीत असलेल्‍या कर्मचा-यांना जोरदार मारहाण करून संपादक वागळे यांनाही मारहाण केली. कार्यालयातील सामान व काचांचीही त्यांनी तोडफोड केली. दरम्‍यान, वाहिनीने या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी अगदी पोचट भूमिका घेतल्‍याचा आरोप केला असून या प्रकरणी संरक्षणाची मागणी केली आहे. स्‍त्रोतः वेबदुनिया

वाचन 33549 प्रतिक्रिया 0