एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.
एक ताईचा सल्ला: जो खरच फायदेशीर आहे.
आज पराशेठ चा ताईचा सल्ला वाचला अन मला माझी ताई लिहीत असणार्या 'साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला' याची आठवण झाली.
हा सल्ला जरी हलकाफूलका, खेळकर वातावरणात लिहीला गेला तरी त्यात माझ्या मते एक अतिशय चांगला सल्ला दिला गेला आहे.
आजकाल सगळीकडे विज, पाणी यांच्या भविष्यातील टंचाईबद्दल बोलले जाते. तस पाहिले तर या दोन्ही गोष्टी आपण फारच हलक्या घेतो. पाणी काय जसे काही फुकटच मिळते, वापरा मनाला येईल तितके.
मी खेडेगावात, तसेच निमशहरी असणार्या पाणीटंचाईला सामोरा गेलेलो आहे. एक हंडा व दोन बादल्या सायकलीला लावून किंवा खांद्यावर ३/४ किमी वरून पाणी वाहून आणलेले आहे. त्याच वेळी पाण्याचा भसाभसा वापर करणारे 'सुशिक्षीत' लोकं पण पाहीली आहेत. आपल्याकडे येणारे पाणी केवळ वाया जावू देत दुसर्याला न देणारेही पाहिले आहेत. पाण्याची लागणारी झळ ही शहरवासीयांना कमी जाणवते हेही मला जाणवले आहे.
पाण्याची अशी परिस्थीती तर विजेचीही तशीच. ऑफीस, सार्वजनीक तसेच 'भारतीय' सण समारंभ (दिवाळी सोडून द्या. तो तर अधिकृत 'दिव्यांचा' सण. ओबामांनीही ते मान्य केलेय! असो.)गणेशउत्सव, रोषणाई, लग्ने यात कितीतरी जास्त प्रमाणात विज उधळली जाते. गणपती, नवरात्र आदीत तर अधिकृतरित्या आकडे टाकून विज चोरी केली जाते. खेडेगावात, शहरी झोपडपट्यांत तर आजही आकडे टाकले जातात. तसले आकडे माझ्यासारखा सामान्य पाहू शकतो पण विज मंडळाचे अधिकारी पाहू शकत नाही. त्याकडे राजकिय पण डोळेझाक करतात.
असो. सदर सल्यामध्ये विज व पाणी (व आपली लागणारी मेहनत) आपण आपल्या वैयक्तिक प्रमाणात कशा प्रकारे वाचवू शकतो याचा उल्लेख आहे. या सल्ल्यात आपण आपले जिन्स कापडाच्या असलेल्या पँन्टी कमीतकमी तिन दिवस (वेळा) वापरणे व त्यांना ईस्त्री न करण्याबाबत सांगितलेले आहे.
मी स्वत: हा सल्ला अंमलात आणला व त्यानंतरच वरील सल्ला लिहीला होता. (न जाणो कुणीतरी, 'तु ते करून बघीतलेस का?' विचारेल म्हणून आधिच सांगीतले आहे. नाहितरी माझ्या नावात 'पाषाण' आहेच. तो कोरडा न ठरावा अशी ईछा होती. असो.)
मी स्वत: जिन्स पँन्ट ३ /४ दिवस वापरतो. (सलग दिवस नाही हो. मधे मधे.) पँन्ट धुतली की चुरगळते. मग मी जुना उपाय अवलंबतो. पँन्टीची मी सळावर घडी करतो व ती पँन्ट कॉटवरील गादी खाली एखादा दिवस ठेवतो. त्याच पॅंटीला महिन्यातून एखाद्यावेळी सळ चांगले रहावे म्हणून धुतल्यानंतर ईस्तरी करतो.
राहता राहीले आता परत त्याच विषयावर लिहीण्याचे प्रयोजन. तर माझ्या 'ताईच्या सल्याला' लोकांनी हलकेफुलके पणाने घेतले. लेखाचा तोच उद्देश होता पण त्याचा गर्भितार्थ मात्र विज, पाणी थोड्याप्रमाणात का होईना कसे वाचवता येईल याकडे होता.
मला एखादी तरी यासंदर्भात प्रतिक्रिया येईल असे वाटले होते. असो.
मला आता या धाग्यावर प्रतिक्रिया आपेक्षीत नाहीत. केवळ हा धागा वाचून मुळ धागा जास्तीत जास्त वेळा वाचला जावा, मुळ धाग्यात माझी यासंदर्भात प्रतिक्रिया प्रकाशित करून आपलाच धागा वर आणल्याचा आरोप होवून नये, कुणीतरी या प्रकारे विज, पाणी वाचवून पर्यावरणाला हातभार लावावा असला हेतू मनात ठेवून मी हा धागा काढला आहे याची कृपया नोंद घ्यावी हि विनंती.
आपणही माझ्यासारखा प्रयोग करून पहा व आपल्याला काय वाटले ते सांगा.
वाचन
8251
प्रतिक्रिया
0