पात्रानी मच्छी
सहजरावांची प्रेरणा उधार ;)
त्यांच्या म्हणन्या नुसार आम्ही आरश्यात पाहीले व सुटलेले पोट आणि फ्व्वाक्कन बाहेर आलेले कुल्ले पाहुन आम्हाला आमचीच लाज वाटली.
त्यांनी दिलेल्या कृतीत थोडी पारशी भर टाकली .
तर ही कृती खास आपल्या सहजरावांना समर्पीत....
साहीत्यः
१ मोठा मासा. (पापलेट असल्यास उत्तम.) नाहीच मिळाला तर मोठ्या माश्याच्या तुकड्या.
पापलेट आमच्या नशीबी कुठे :( त्या मुळे लोकल माश्यावर (क्रोकर ) प्रयोग केला.
हळद, मीठ, लिंबाचा रस
चटणी साठी.
लिंबाचा रस.
१ वाटी नारळ.
१/२ कांदा बारीक चिरुन.
१ चमचा आलं-लसुण पेस्ट.
कोथींबीर, पुदिना पाने.
१/२ चमचा बडीशेप.
२ हिरव्या मिरच्या.
मीठ, साखर चवीनुसार.
कृती:
१ ) कांदा बडिशेप थोड्या तेलावर परतुन मग वरील चटणीचे साहित्य एकत्र करुन चटणी वाटुन घ्या.
२) मासा स्वच्छ करुन पाठी कडुन एक मोठी चीर देउन चटणी भरण्या साठी जागा करुन घ्या.
माश्याला हळद मीठ, आणि लिंबाचा रस लावुन १/२ तास मुरत ठेवा.
तोव्हर ओव्हन पण १५० ते २०० डि.से. वर सेट करा.
३) तयार चटणी माश्यात भरुन. वरुन पण चटणी लावा.
४) शक्य असल्यास केळीच्या पानात अथवा अॅल्युमिनीयमच्या फॉईल मध्ये गुंडाळा आणि १५-२० मिनिटं ओव्हन मध्ये भाजुन घ्या.
(मी केळीच्या पानात बांधुन मग वरुन अॅल्युमिनीयमच्या फॉईल गुंडाळली)

वाचन
14458
प्रतिक्रिया
0