!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३
सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली.
ये समयी तडीताच्या तोफांचा भडीमार जाहला.....लखलखाट् तर विचारु नये एवढा तौबा झाला.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले. भूमीवरची वीज अत्यानन्दाने आकाशीच्या भगीनीला भेटावयास निघोन गेली
मिपा सदस्यांच्या मार्गात हा अडथळा आडवा आला नाही...पलिते त्वरेने पेटवले गेले.ही तो पंचतारांकीत बुभुक्षालयात व्हावी तैसी खातिरदारी झाली. स्वामी संतोष पावले (विख्यात तीव्र धनुर्धर सदा पावले चे हे कोणीही नाहीत).
सरदार विजुभाऊ ना सर्व मनसबदारानी सरदारानी पुन्हा वापसीने वोळख करोन दीली.....
सरदार धमाल यानी दारुगोळा आणि दाणागोट्याचा जातीने चोख बंदोबस्त ठेवला होता.तमाम खाषा स्वार्या त्या सरलश्करी बंदोबस्तावर फिदा जाहल्या. उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या. सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले. ऐशी अनुभवी मंडळी हे तर मिपा साम्रज्याचे वैभव्...जणु फतेलश्कर दल्........ऐशी खाशी नवरत्ने तर आलमगीर बादशाहाच्या दरबारी ही नव्हती ऐसे इतिहासात नमुद आहे.
येकेक वीर पात्रे बह्रो लागले. त्यात हीम नग टाको लागले फेनद द्रव्य ही टाकों...काही तर केवळ हीम नग च वापरुन पात्रास पाहोन चिंतन करों लागले. ये समयी किर्र शांतता पसरली. खलबते आता द्रुष्टीपथात होती. सरदारांची चिंतन मन पाठ सुरु जाहले..
मग थोड्या कालाने राजविडंबकवीसरदार केषवसुमार खुलते जाहले.....त्यानी कवितेची एक फैर झाडली....गनिमांच्या झोपा आकाशी गरुड उडावा तैशा असमानी उडाल्या.
मग सरदार दंताड वैदु प्रसाद दाढे यांना त्यांचा गाता गळा आठवला....नरड्यात मझा आहे बॉ ऐसे दाद ठायी ठायी घेतल्यावर
दुसरे मनसबदार सरदार विजुभाऊ याणी भिमसेनी थाटात बालगीत "गोरी गोरी पान" पेष केले.....हे तात्यांस कैसे चलते ऐसी काही नतद्रष्ट्रानी प्रुछाकेली.....
मग सरदार चित्तर यानी आपल्या भक्कम बाहुनी एक से एक खर्ड्या यावनी उर्दुत काही वाघ ( ऊर्फ शेर) पेष केले...ते समयी दाणागोटा पुरवठा पहाणारे उल्मुल्क मा सफदर्जंग सरदार भुईणळा यानी काही हरकती केल्या ते समयी त्याणी ईर्षाद ईर्षाद ऐसे उद्गार काढीले.
सार्यांस बहुत आस्चर्य जाहले...त्यावरी त्याणी खुलासा जे केला की मूळ यावनी ईर्षाद हा शब्द सूद्ध भारतीय आहे...ईर्षाद मूळ उचार
'नाईलाज" ऐसा आहे...त्याचा मतलब ही तोच आहे....
ये समयी मि पा सदस्यानी ईर्षाद हा शब्द नाईलाज ये अर्थाने भविस्यात वापरणेचा आहे ऐसा ठराव करणेत आला. त्यास येक्मुखाने सर्वानी दुजोरा दीला.....
ईतरही काही म्हत्वाचे ठराव ये समयी सदनात पेष केले गेले
ईतर ठराव्..........काय जाहले ते
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी
म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ...
व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी
धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी
आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी
ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात ( हा बखरी तला चौक आहे...प्रस्तुत लेखकाने हा शब्द फकस्त पवाड्यातच ऐकला आहे..वाद नको)
म्हणे शाहीर विजुभाऊ सर्वांस जी र जी र जी र जी जी जी जी
....आद्य बखरनवीस्.....विजुभाऊ कलमदाने....
( मि पा पुणे पहीला कट्टा सहसंवादःचर्चा ठराव्....बखरीच्या पूढील भूर्जपत्रावर)
वाचन
8001
प्रतिक्रिया
0