मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टाटा स्काय प्लस... माहिती हवी आहे...

भडकमकर मास्तर · · काथ्याकूट
हे टाटा स्काय प्लस प्रकरण जेव्हा गेल्या वर्षी आले होते तेव्हा चांगलेच इन्ट्रेष्टिंग वाटले होते पण किंमत महाग म्हणून आम्ही घेतले नाही.. डीटीएच मध्ये लाईव्ह टीव्ही पॊज, रेकॊर्ड आणि रिवाईन्ड ्करता येते. ४५ तासाचे रेकॊर्डिंग उपलब्ध असते. ते लोक असे म्हणतात की आपली टीव्ही पहायची पद्धत बदलून टाकेल टाटा स्काय प्लस. पुष्कळ निरर्थक पाहण्यात वेळ जातो, त्याऐवजी मोजकेच उपयोगी कार्यक्रम पाहिले जातील असे वाटते. तेव्हा किंमत ९ हजार होती. Image removed. ( आमीर आणि गुल पनगची जाहिरात छान असली म्हणून काय झालं?) परवडायला नको? आता दिवाळीपर्यंत घेतल्यास ५ हजार झाली आहे. .. दिवाळीनंतर पुन्हा ९ हजार होणार आहे..... विचार करायला फ़ारसा वेळ उरला नाहीये... इथे कोणी टाटा स्काय ( विशेशत: प्लस) वापरते काय? आपला अनुभव कसा आहे? विशेषत: स्वच्छ चित्र (क्लॆरिटी), महिना बिल, तांत्रिक सपोर्ट कसा आहे? ( की कॊल सेन्टरशी दिवसेन्दिवस डोके लढवत बसावे लागते?.. टाटा ब्रॊडबॆंडचा अनुभव बरा नाही.)

वाचन 19621 प्रतिक्रिया 0